ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सनेल पुढील तीन किंवा अधिक महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामागील कारणच थक्क करणारे आहे. मित्राच्या वाढदिवस पार्टीमध्ये त्याच्या पायला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने त्याच्या दुखापतीबाबतचे अधिकृत निवेदन जाहीर केले नसले तरी क्रिकेट डॉट कॉम एयूच्या रिपोर्टनुसार त्याची दुखापत गंभीर असल्याचे समजते.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा बॅकयार्डमध्ये त्याच्या मित्राचा वाढदिवस सेलेब्रेट करत होता. तेव्हा तो आणि त्याचा एक मित्र घराच्या मागील बाजूला पळत होते. त्याच दरम्यान ते दोघेही घसरले आणि मॅक्सवेलचा पाय दुसऱ्याच्या पायात अडकला, तो त्याचा मित्र असण्याची शक्यता आहे. त्याला शनिवारी (13 नोव्हेंबर) ही दुखापत झाली असून त्यामध्ये त्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याच्या पायावर सर्जरी झाली आहे. त्यानंतर तो रिहॅबिलिटेशनसाठी जाणार आहे.
मॅक्सवेलला दुखापतीमुळे आगामी वनडे मालिकेतूनही बाहेर केले आहे. ही मालिका इंग्लंडविरुद्ध काही दिवसांतच खेळली जाणार आहे. त्याचबरोबरच तो बिग बॅश लीगच्या संपूर्ण हंगामालादेखील मुकणार आहे. या स्पर्धेत तो मेलबर्न स्टार्सकडून खेळतो. तसेच तो डिसेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या शिफिल्ड शील्ड स्पर्धेलाही मुकणार आहे. त्याच काळात ऑस्ट्रेलिया ए संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धही खेळणार आहे, यामध्येही तो खेळणार का याची शक्यता कमीच आहे.
‘मॅक्सवेल हा संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्यासोबत ही दुर्दैवी घटना झाल्याचे वाईट वाटते. त्याने मागील काही सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. त्याला पूर्णपणे तंदुरूस्त होण्याच्या प्रवासात आम्ही त्याच्यासोबत असणार आहोत,” असे ऑस्ट्रेलियाचे मुख्य संघनिवड अधिकारी जॉर्ज बेली (George Bailey) म्हणाले. Glenn Maxwell suffers fractured leg in freak accident & ruled out of upcoming odi series
क्रिकेटच्या स्पर्धेत दुखापती या होतच असतात. टी20 विश्वचषकाआधीच इंग्लंड जॉनी बेयरस्टो हा पण गोल्फ खेळताना जखमी झाल्याने टी20 विश्वचषकाला मुकला होता. याच स्पर्धेच्या काही दिवसांआधीच इंग्लंडचा युवा खेळाडू जोश इंग्लिस गोल्फ खेळताना गंभीर दुखापतग्रस्त झाला होता.
ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड वनडे मालिका (पुरूष क्रिकेट संघ)
17 नोव्हेंबर – पहिला सामना, ऍडलेड ओव्हल
19 नोव्हेंबर – दुसरा सामना, सिडनी क्रिकेट ग्राउंड
22 नोव्हेंबर- तिसरा सामना, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती’, डिविलियर्सला मुंबईच्या रस्त्यावर चहा पिताना पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट
अर्रर्र! आयर्लंडने इंग्लंडच्या खेळाडूचा केला पानउतारा, ट्वीटमधून करून टाकले जोरदार ट्रोल