वेस्ट इंडिज विरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी (IND vs WI) कोरोनाने भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य पॉझिटिव्ह आढळले. खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर निवडसमितीने कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अगरवालचा वनडे संघात समावेश केला आहे. मयंक नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेसाठी संघाचा भाग होता.
खेळाडू आढळले कोरोना पॉझिटिव्ह
भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि स्टँडबाय खेळाडू नवदीप सैनी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या कारणास्तव बीसीसीआयने तात्काळ मयंक अगरवालला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा जोडीदार म्हणून मयंक डावाची सुरुवात करताना दिसेल अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, मसाजीस्ट राजकुमार व अन्य एक सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असून या सर्वांना विलगीकरण ठेवण्यात आले आहे.
मयंकचा केला गेला संघात समावेश
बीसीसीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती देताना सांगितले, ‘आरटीपीसीआर चाचणीच्या तीन फेऱ्यांनंतर वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह सात सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय वरिष्ठ निवड समितीने मयंक अगरवालचा भारताच्या वनडे संघात समावेश केला आहे.’
संघात निवड झालेल्या सर्व सदस्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी ३१ जानेवारी २०२२ रोजी अहमदाबाद येथे कोरोना अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. अहमदाबादला जाण्यापूर्वी प्रत्येक सदस्याला घरी आरटी-पीसीआर चाचणी घेण्यास सांगण्यात आले होते. चाचणी नकारात्मक आल्यानंतरच अहमदाबादला येण्याची परवानगी देण्यात आलेली.
अशी होणार वनडे मालिका
६ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला ही मालिका संपेल. भारत आणि वेस्ट इंडिजमधील तिन्ही वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.
भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अगरवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
महत्वाच्या बातम्या-




