मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली इंडिया ए संघानं दुलीप ट्रॉफी 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी इंडिया सी संघाचा 132 धावांनी पराभव केला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली इंडिया सी साठी साई सुदर्शननं शतक झळकावलं. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गायकवाडला पहिल्या डावात विशेष काही करता आलं नाही. दुसऱ्या डावात तो 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इंडिया ए साठी शाश्वत रावतनं पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं.
इंडिया ए संघानं पहिल्या डावात 297 धावा केल्या होत्या. संघासाठी शाश्वतनं अप्रतिम फलंदाजी केली. त्यानं 250 चेंडूंचा सामना करत 124 धावा केल्या. शाश्वतच्या या खेळीत 15 चौकारांचा समावेश होता. याशिवाय आवेश खाननं नाबाद अर्धशतक झळकावलं. त्यानं 68 चेंडूत 51 धावा केल्या. इंडिया ए संघानं आपला दुसरा डाव 286 धावांवर घोषित केला. संघासाठी रियान परागनं 73 धावांचं योगदान दिलं. त्यानं 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. शाश्वतनं पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत 53 धावा केल्या. कुशाग्रानं 42 धावांची खेळी खेळली.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील इंडिया सी ने पहिल्या डावात 234 धावा केल्या. संघासाठी अभिषेक पोरेलनं 82 धावांची खेळी केली. त्यानं 9 चौकार मारले. रजत पाटीदार शून्यावर बाद झाला. साई सुदर्शन 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघ दुसऱ्या डावात 217 धावा करून ऑलआऊट झाला. गायकवाडनं 44 धावांचं योगदान दिलं. तर सुदर्शननं शतक ठोकलं. त्यानं 206 चेंडूत 111 धावा केल्या. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. इंडिया सी साठी याशिवाय कोणीही विशेष काही करू शकलं नाही.
हेही वाचा –
रिषभ पंतनं काढली एमएस धोनीची आठवण, चेन्नई कसोटीनंतर माजी कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य
विराट कोहलीनं घेतली बांगलादेशची मजा! मैदानावरील नागिन डान्सचा व्हिडिओ व्हायरल
अश्विनची अष्टपैलू कामगिरी, पंतचं ड्रीम कमबॅक; भारत-बांगलादेश कसोटीच्या 5 महत्वाच्या घटना जाणून घ्या