विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी मंगळवारी (१५ जून) १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात सलामी जोडी म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन द्विशतके झळववणाऱ्या सलामीवीर मयंक अगरवाल याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (Mayank Agarwal not selected in 15 members squad for WTC final)
अगरवालने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एकूण १२ सामने खेळले आहेत. यात त्याला ४३ च्या सरासरीने ८५७ धावा केल्या आहेत. यात त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके मारली आहेत. या तीन शतकांमध्ये २ द्विशतकांचाही समावेश आहे. मुख्य बाब म्हणजे, अगरवालव्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला २ द्विशतके करता आली नाहीत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी एक द्विशतक केले आहे.
याबरोबरच अगरवालने चेतेश्वर पुजारा पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. पुजाराने या स्पर्धेत १७ सामन्यात एकूण ८१८ धावा केल्या आहेत. यात त्याने ९ अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याला एकही शतक झळकावता आले नाहीय.
तसेच अंतिम सामन्यात सलामी फलंदाजी करण्यासाठी येणाऱ्या, शुबमन गिलने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एकूण ७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ३४ च्या सरासरीने ३७८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याला एकही शतक करता आले नाही. त्याला केवळ ३ अर्धशतक झळकवण्यात यश आले होते. गिलला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आले होते. त्याने या दौऱ्यावर उल्लेखनिय कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेसाठी स्थान देण्यात आले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, कामगिरीनुसार गिलपेक्षा अगरवाल विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळण्याचा प्रबळ दावेदार होता. सलामीव्यतिरिक्त मधल्या फळीतही तो पुजारापेक्षा चांगली फलंदाजी करु शकला असता.
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
किवींना आस्मान दाखवण्यास सज्ज! जड्डूच्या गोलंदाजीवर पंतचा गगनचुंबी षटकार, एकदा पाहाच
‘हे काय घातलंस, तू भारतीय क्रिकेटपटू आहेस,’ द्रविडने एका टी-शर्टवरुन घेतली होती रैनाची शाळा