सध्या विजय हजारे ट्राॅफी (Vijay Hazare Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये कर्नाटकचा फलंदाज ‘मयंक अग्रवाल’चा (Mayank Agarwal) अप्रतिम फॉर्म कायम आहे. देशांतर्गत वनडे स्पर्धेत विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने हैदराबादविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे. या स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. अहमदाबादच्या रेल्वे क्रिकेट मैदानावर त्याने ही कामगिरी केली.
आयपीएल 2025च्या मेगा लिलावात मयंक अग्रवालला कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्यामुळे तो या मेगा लिलावात अनसोल्ड ठरला.
‘मयंक अग्रवाल’ने (Mayank Agarwal) मंगळवारी (31 डिसेंबर) 95 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने निकिन जोससोबत 91 धावांची सलामी दिली. समरन रविचंद्रनसोबत 104 धावांची खेळी खेळली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर कर्नाटकने 8 बाद 320 धावा केल्या. दरम्यान मयंकने 112 चेंडूत 124 धावा केल्या. यावेळी त्याने 15 चौकारांसह 2 षटकार लगावले.
मयंत अग्रवालने यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग शतके झळकावली होती. पहिल्या सामन्यात त्याने मुंबईविरूद्ध 47 धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर पुद्दुचेरीविरूद्ध 18 धावा केल्या होत्या. मयंकने पंजाबविरूद्ध नाबाद 139 आणि अरूणाचल प्रदेशविरूद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या.
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती घेऊ शकतात. अशा परिस्थितीत मयंक अग्रवालचा अलीकडचा फॉर्म त्याला भारतीय संघात पुनरागमनाचा दावेदार असल्याचे मानले जात आहे.
मयंक अग्रवालच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 21 कसोटी, 5 वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 21 कसोटी सामन्यांच्या 36 डावात फलंदाजी करताना 1,488 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 6 अर्धशतकांसह 4 शतके देखील आहेत. 5 वनडे सामन्यात मयंकने 86 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 86 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्राॅफीमध्ये धमाकेदार खेळी
मोठी अपडेट; इंग्लंडविरूद्धच्या आगामी वनडे मालिकेतून रोहित, विराट बाहेर
“हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टेस्ट …”, बॉक्सिंग डे कसोटीबाबत पॅट कमिन्सची प्रतिक्रिया समोर