22 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी भारत आणि इंग्लंडमध्ये व्हाईट बॉल सिरीज खेळली जाणार आहे. उभय संघांमध्ये 5 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जातील. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करणारा मयंक यादव अजूनही पाठीच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. मयंक गेल्या वर्षी जखमी झाला होता. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याचा सहभाग जवळजवळ अशक्य दिसत आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मयंक यादव इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळण्याची अपेक्षा नाही.
23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दिल्लीच्या संभाव्य संघातही मयंकचा समावेश करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत त्याला भारतीय संघात पुनरागमन करणं खूप कठीण आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, “मयंक यादवला पाठीची दुखापत झाली आहे. तो इंग्लंड मालिकेसाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे.”
आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा मयंक दुखापतीमुळे स्पर्धेच्या मधूनच बाहेर पडला होता. त्यानंतर मयंकनं ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं तीन सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. या मालिकेत मयंकला पुन्हा दुखापत झाली आणि तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीला मुकला. आता मयंक कधी पुनरागमन करू शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मयंक यादवनं 4 आयपीएल सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं भारतासाठी 3 टी20 सामने खेळताना 4 बळी घेतले. विशेष म्हणजे, या दोन्हीमध्ये त्याची इकॉनॉमी 7 पेक्षा कमी राहिली.
हेही वाचा –
या 3 खेळाडूंची चांदी.! वनडे मालिकानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संधी मिळण्याची शक्यता
काय सांगता! कॅच पकडल्यानंतर चाहत्याला 90 लाख रुपयांचे बक्षिस, या स्पर्धेसमोर आयपीएलही फेल!
रोहित शर्मा नाही तर हा खेळाडू सर्वोत्तम कर्णधार, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य