पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर चषक जिल्हास्तरीय धर्नुविद्या स्पर्धेत आर्चर्स अॅकॅडमीचे राष्ट्रीय खेळाडू कोमल पडवळ, जुई ढगे, वेदांत दुधाणे, आदित्य गदादे यांनी पदकाची लयलुट करीत वर्चस्व गाजवले.
एसएसपीएसएम महाविद्यालयाच्या मैदानावर संपलेल्या जिल्हास्तरीय 14 वर्षा खालील धर्नुविद्या स्पर्धेत आर्चर्स अॅकॅडमीच्या खेळाडूंनी 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची कमाई करीत महापौर चषक पटकविला. पदक वितरण समारंभ मनपाच्या क्रीडाधिकारी किशोरी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्पर्धा समन्वयक शशांक चुटके, अजय सोनावणे, राष्ट्रीय प्रशिक्षक राम शिंदे, ओंकार घाडगे, सुधीर शिंदे, अनिल सोनावणे, सागर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय धर्नुविद्या स्पर्धा संपताच खेळाडू व पालकांच्या आग्रहास्तव जिल्हास्तरीय 14 वर्षा खालील धर्नुविद्येचे आयोजन ऐनवेळी मनपाने यशस्वी केले. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी शहरातील खेळाडूंही स्पर्धेपासून वंचित राहू नये म्हणून तातडीने अतिरिक्त निधि उपलब्ध करून स्पर्धा जाहिर केली. पुणे जिल्हा धर्नुविद्या संघटनेचेे सचिव विकास मानकरने यांनी तातडीने कार्यवाही करीत खेळाडूंना न्याय मिळवून दिला.
स्पर्धेत सर्वाधिक चुरस इंडियन प्रकारात पहाण्यास मिळाली. भर उन्हात 20 मीटर व 30 मीटरचे 12 फेर्या खेळविण्यात आल्या. राष्ट्रीय खेळाडू वेदांत संजय दुधाणे व अनुभवी धर्नुधर सन्मान शैलेश गोसावी, लंबोधर पडवळ, आयुष पोकळे यांनी अचूक यांच्या पहिल्या फेरीपासून स्पर्धा रंगली.
13 वर्षीय सन्मानने 667 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. 10 वर्षीय वेदांतने 594 गुणांची नेमबाजी करीत रौप्यपदकावर नाव कोरले. सतत पदकापासून दूर राहिलेल्या आयुष पोकळेला अखेर महापौर चषक स्पर्धेत पदकाची जादू घडविता आली. 574 गुणांसह त्याने कांस्य पदकाची कमाई केली. इंडियन प्रकारातील मुलींच्या गटातही आर्चर्स अॅकॅडचे खेळाडूंचा मक्तेदारी दिसून आली.
रिकर्व्ह प्रकारात राष्ट्रीय शालेय स्पर्धा गाजविणार्या कोमल पडवळने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत सुवर्णपदकाचे लक्ष्य वेधले. दुखापतीनंतर राष्ट्रीय खेळाडू जुई ढगेनेही 50 मीटर प्रकारात रौप्यपदक कमवले. स्पर्धेम फोकस अॅकॅडमीच्या खेळाडूंनी रिकर्व्ह प्रकारात आपले वर्चस्व दाखवून दिले. शिवम शिंदे व आर्य काकडेने अनुक्रमे 290 व 283 गुणांची खेळी करून सुवर्ण व रौप्य पदक जिंकले.
स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे
इंडियन 20 व 30 मीटर मुले
मुले -1. सन्मान गोसावी, 2. वेदांत दुधाणे,3. आयुष पोकळे मुली -1. आयुषी पोळकर,2. अनुश्री चांदगुडे 3. हर्षाली पोतनीस
रिकर्व्ह 50 मीटर
मुले 1. शिवम शिंदे, 2. आर्या काकडे, 3. शाश्वत आवटे मुली 1. कोमल पडवळ 2. जुई ढगे 3. ईरा किंकरे
कंम्पाऊंड 50 मीटर
मुले 1. आदित्य गदादे 2. यशराज महाजन, 3. ओम शिवतरे