रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) यांच्या वतीने आयोजित आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत अंतिम फेरीत मझहर ताहेरभॉय याने जितेश पतोडीयाचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
आरसीबीसीच्या स्नूकर हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत मझहर ताहेरभॉय याने जितेश पतोडियाचा 4-1(89-73, 104-90, 41-87, 94-74, 102-76) असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. सामन्यात मझहरने सुरेख सुरुवात करत जितेशविरुद्ध पहिल्या दोन फ्रेम 89-73, 104-90 अशा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर जितेशने जोरदार कमबॅक करत 87-41 अशी जिंकून हि आघाडी कमी केली. पण मझहरने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत पुढील दोन्ही फ्रेम जितेश विरुद्ध 94-74, 102-76 अशा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील विजेत्या मझहर ताहेरभॉय याला करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीएसएएमचे अध्यक्ष राजन खिंवसरा, रॉयल कॅनॉट बोट क्लबचे(आरसीबीसी) अध्यक्ष अरूण कुदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरसीबीसीचे सचिव मछिंद्र देवकर,आरसीबीसीचे स्पोर्ट्स चेअरमन समीर सावला, जितेश पतोडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: Mazhar Taherbhoy wins RCBC Handicap Snooker Championship
मझहर ताहेरभॉय वि.वि.जितेश पतोडिया 4-1(89-73, 104-90, 41-87, 94-74, 102-76).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताचे वेगवान गोलंदाज सतत दुखापतग्रस्त’, दिग्गजाने एनसीएच्या अपयशावर उठवले प्रश्न
एक वेळ नोकरीसाठी पसरत होता हात; आता बनणार टीम इंडियाचा सिलेक्टर?