महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगची साखळी फेरी अखेरीकडे आलेली आहे. या साखळी फेरीनंतर स्पर्धेत महिला क्रिकेटपटूंचे तीन प्रदर्शनीय सामने पाहायला मिळणार आहेत. या सामन्यांसाठी तीन संघांची घोषणा करण्यात आली असून, भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधर स्मृती मंधाना ही देखील या स्पर्धेत सहभागी होईल.
महिलांच्या #MPL प्रदर्शनीय सामन्यांसाठी संघ खालील प्रमाणे 👇 pic.twitter.com/jIfu5I98rM
— Mahesh (@MaheshMGW23) June 22, 2023
सध्या सुरू असलेल्या पुरुषांच्या एमपीएल स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. त्यातून चार संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरतील. साखळी फेरीच्या समाप्तीनंतर प्ले ऑफ सामन्यादरम्यान असलेल्या एका दिवसांच्या सुट्ट्या दरम्यान हे तीन सामने खेळण्यात येतील. अनुक्रमे 25 जून, 27 जून व 28 जून रोजी हे सामने होणार आहेत. हे तीनही सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर खेळले जातील.
या संघांना अनुक्रमे एमसीए ब्लू, एमसीए रेड व एमसीए यलो अशी नावे दिली आहेत. ब्लू संघाचे नेतृत्व भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना, रेड संघाचे नेतृत्व अष्टपैलू देविका वैद्य व यल्लो संघाचे नेतृत्व फलंदाज तेजल हसबनीस करेल. भारतीय संघात खेळलेल्या किरण नवगिरे, अनुजा पाटील यांचा देखील समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याची पत्नी उत्कर्षा हीदेखील एमसीए रेड संघासाठी खेळताना दिसेल.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी एमपीएल लिलावावेळी पुढील वर्षी महिला एमपीएलचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या हंगामात चार संघ सहभागी होतील. तसेच एमपीएल उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघासाठी खेळलेल्या महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला होता.
(MCA Announced Sqaud For Womens Exhibition Match At MPL Smriti Mandhana Lead Side)