मुंबई, दि.25 (क्री .प्र.)- स्पोर्टिंग युनियन क्लब आयोजित 16 वर्षाखालील मुलांची दहावी संतोष कुमार घोष ट्रॉफीला येत्या गुरूवार म्हणजेच 27 ऑक्टोबरपासून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (शिवाजी पार्क) सुरूवात होत असून या स्पर्धेत (एक लढत वगळता) दर 16 संघ खेळणार आहेत. स्पर्धेच्या सर्व लढती शिवाजी पार्कच्या (विविध खेळपट्यांवर खेळविल्या जातील, अशी माहिती स्पोर्टिंग युनियन क्लबच्या सचिव आणि आयोजिका अरूंधती घोष यांनी दिली.
करोनामुळे दोनवेळा लांबणीवर पडलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळविली जात असून या स्पर्धेत पोलीस जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब, दिलीप वेंगसरकर क्रिकेट ऍकेडमी, ओरिएण्टल क्रिकेट क्लब, शिवाजी पार्क जिमखाना,पय्याडे असे बलाढ्य संघही यात खेळणार आहेत.
मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता असलेल्या या स्पर्धेला आयडीबीआय, एलआयसी, कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही स्पर्धा 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत रंगेल. स्पर्धेचा अंतिम सामना शिवाजी पार्क जिमखान्याच्या खेळपट्टीवर खेळविला जाणार असल्याचे घोष यांनी सांगितले.