पुणे । आज भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यातील दुसरा वनडे सामना येथे होत आहे. परंतु येथील खेळपट्टी वरून मोठा वाद झाला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर हे ‘खेळपट्टी कशी असेल’ हे ऑन कॅमेरा सांगताना दिसले तर काही लोक आज सकाळी खेळपट्टीला इजा पोहचेल असे करताना दिसले. हे सर्व स्ट्रींजर पत्रकार होते.
या पत्राकारांशी खेळपट्टीबद्दल साळगावकर बोलत होते. तसेच खेळपट्टी कशी असेल माहिती देत होते. इंडिया टुडेवर प्रसिद्ध झालेल्या एका विडिओनुसार स्ट्रींजर पत्रकार खेळपट्टीला हानी पोहचेल असे कृत्य करताना या विडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
शिवाय दोन खेळाडूंना खेळपट्टीकडून बाउन्स हवा असल्याचेही बोलले जात आहे. याबद्दल साळगांवकरांना स्ट्रींजर पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले ते होईल.
साळगावकर पुढे असेही म्हणाले की या मैदानावर ३३७-३४० धावा होतील. त्यांनी कॅमेऱ्यावर सांगितले की धावसंख्या अंदाजे ३३७ असेल . काही पत्रकारांना देखील मैदानावर खेळपट्टीचे निरीक्षण करायला मिळाले. हा आयसीसी तसेच बीसीसीआयच्या नियमांचा भंग आहे.
याबद्दलची एक ऑडिओ क्लिपही लीक झाली आहे. ती इंडिया टुडेने प्रसिद्ध केली आहे .
एमसीएचे अध्यक्ष अभय आपटे इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले ,” आम्ही परिस्थीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही खात्री देतो की जर कुणी दोषी आढळलं तर आम्ही कठोर कारवाई करू. ”