लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावनी करण्याच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने पहिले उचलले आहे.
त्याचा पहिला झटका भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरला बसला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकांच्या समितीने अजित आगरकरकडे असललेल्या क्रिकेट सुधारना समितीचे आणि वरीष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदापैकी एकचा राजीनामा देण्याची सुचना दिली आहे.
लोढा समितीच्या शिफारसीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि कोणत्याही राज्य क्रिकेट संघटनेत ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमानुसार एकाचवेळी दोन पदांवर राहता येेत नाही.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये गेल्या एक दशकांपासून क्रिकेट सुधारना समिती अस्तित्वात आहे. प्रशिक्षकाची, ट्रेनर आणि फिजिओ यांची विविध वयोगटातील संघांसाठी निवड करण्याची जबाबदारी या क्रिकेट सुधारना समितीकडे आहे.
तर वरीष्ठ निवड समिती देशांतर्गत सामन्यांसाठी मुंबई संघाची निवड करण्याचे काम करते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुत्रांनुसार अजित आगरकरने क्रिकेट सुधारना समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तो वरीष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम रहणार आहे.