इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केली. सलग दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडच्या बॅझबॉल क्रिकेटचा फुगा फोडत ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. लॉर्ड्स कसोटीच्या अखेरच्या दिवशी मैदानावर मैदानाबाहेर अनेक अशा घटना पाहायला मिळाल्या ज्या पूर्णपणे अनपेक्षित होत्या. लॉर्ड्सच्या मेंबर्स एरिआमध्ये खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत गैरव्यवहार देखील झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की करणाऱ्या त्यातील सदस्यांवर आता मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) कारवाई केली आहे.
पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघ ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी इंग्लंड संघाच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप दिसत होता. कारण त्याआधीच त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याला नाटकीय पद्धतीने बाद दिले गेले होते. याच पार्श्वभूमीवर खेळाडू ड्रेसिंग रूमकडे परतताना लॉर्ड्सच्या मेंबर्स एरिआमध्ये (लॉन्ग रूम) ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्याठिकाणी उपस्थित सदस्य यांच्यात वाद झाला. काही सदस्यांनी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उस्मान ख्वाजा व डेव्हिड वॉर्नर यांना काही अपशब्द वापरले. तसेच काहींनी ख्वाजा याच्याशी झटापट देखील केली.
या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एमसीसीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करत गैरवर्तन करणाऱ्या तीन सदस्यांवर कारवाई केली. तसेच, क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची माफी देखील मागितली.
एमसीसीने म्हटले, ‘लॉंग रूममधून ड्रेसिंग रूमकडे जाणे, ही एक महान परंपरा आहे. घडलेल्या घटनेबद्दल सर्वांना खेद आहे.’
क्रिकेटची पंढरी मानले जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर काही निमंत्रित लोकांना लॉर्ड्स मेंबर्स एरियामध्ये बसण्याची परवानगी दिली जाते. यासाठी लोक अनेक वर्ष नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत असतात.
(MCC issues apology to Australia and suspends three members pending investigation)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचा ‘लायन’ ऍशेसमधून बाहेर! 12 वर्षानंतर प्रथमच नाही घालणार बॅगी ग्रीन
लॉर्ड्सवर बेन ब्लास्ट! संघ पराभूत झाला तरी स्टोक्सने मोडला 24 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड