जगभरातील क्रिकेट नियमावली तयार करणाऱ्या लंडनस्थित मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) क्रिकेटमध्ये येऊ घातलेल्या एका मोठ्या बदलास सध्या नकार दिला आहे. क्रिकेटमध्ये संशोधन करणाऱ्या केंब्रिज विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी बांबूची बॅट वापरण्याविषयी दिलेल्या कल्पनेला केराची टोपली दाखवली. क्रिकेटमध्ये अशा प्रकारची बॅट वापरल्यास हे नियमबाह्य ठरेल असे, एमसीसीने स्पष्ट केले.
या दोघांनी सुचविला होता पर्याय
जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठातील क्रिकेट विषयावर संशोधन करणारे दर्शील शहा व बेन टिंकलर डेव्हिस हे जवळपास १५ वर्ष क्रिकेटमध्ये बांबूची बॅट वापरण्यात येऊ शकतो का याविषयी चाचपणी करत होते. त्यांचे म्हणणे होते की, “बांबूची बॅट ही लाकडी बॅटपेक्षा अधिक टिकाऊ आहे. तसेच ही बॅट जास्त मजबूत असेल. बांबूच्या बॅटने यॉर्कर खेळण्यास अधिक सोपे जाईल. ही बॅट सर्व प्रकारचा फटक्यांसाठी उपयुक्त आहे.”
काय म्हणतो नियम?
सध्या क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅट इंग्लिश विलो किंवा कश्मिरी विलो या लाकडापासून बनवल्या जातात. एमसीसीच्या नियम ५.३.२ नुसार बॅट ही लाकडी असावी. बांबू हे गवत असल्याने ते बॅट म्हणून वारण्यात येऊ शकत नाही. बांबूच्या बॅटविषयी एमसीसीने स्पष्ट केले की, “अशा प्रकारच्या बॅटला परवानगी देणे अवैध ठरेल. सध्या हे नियमांच्या विरुद्ध आहे. मात्र, एमसीसी उपसमितीच्या या बैठकीत या विषयी चर्चा केली जाऊ शकते.”
MCC has read with interest the research study from the University of Cambridge, which suggests that cricket bats made from bamboo offer a more suitable alternative to the traditional use of willow.
Our statement can be read below ⬇️
— Marylebone Cricket Club (@MCCOfficial) May 11, 2021
यापूर्वी वापरल्या गेल्या आहेत अशा बॅट
क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत लाकडी बॅट व्यतिरिक्त ॲल्युमिनियमची बॅट एकदा वापरली गेली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांनी सन १९७९ मध्ये इंग्लंड विरुद्ध ॲल्युमिनियमची बॅट वापरलेली. तर, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडन याने आयपीएलमध्ये विचित्र आकाराची मुंगूस बॅट वापरलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयची खास योजना, शास्त्री नव्हे तर हा दिग्गज असणार संघ प्रशिक्षक?
वयाची पन्नाशी ओलांडलेला ‘हा’ क्रिकेटपटू हॉलिवूड अभिनेत्रीवर झालाय घायाळ, सोशलवर रंगली तुफान चर्चा