भारताची गोळाफेक खेळाडू किरण बालियान हिने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धा गाजवली आहे. 24 वर्षीय किरणने इतिहास घडवला आहे. तिने गोळाफेक खेळात कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. किरणने 17.36 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्य पदक आपल्या नावावर केले. हे तिच्या कारकीर्दीतील पहिले सर्वात मोठे पदक आहे.
चीनच्या लिजियाओ गोंगने जिंकले सुवर्ण
किरण बालियान (Kiran Baliyan) ही चीनच्या लिजियाओ गोंग (Lijiao Gong) हिच्या मागे राहिली. तिने 19.58 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. लिजियाओने हे पदक जिंकत आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावण्याची कमाल केली. चीनच्या जियायुयान सोंग हिने 18.92 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले.
किरणने घडवला इतिहास
किरण बालिया हिने सुरुवातीपासूनच चांगला खेळ दाखवला. तिने 15.42 मीटर थ्रोसोबत सुरुवात केली. त्यानंतर तिने 16.84 मीटरसोबत 17.36 मीटर लांब लोखंडी गोळा फेकला. हा हांगझोऊ ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडिअममधील तिचा सर्वोत्तम प्रयत्न होता. किरणने तिच्या अखेरच्या प्रयत्नात 16.76 मीटर, 16.79 मीटर आणि 16.87 मीटर गोळा फेकत तिसरे स्थान काबीज केले.
Kiran Baliyan: Bronze: Shotput #IndiaAtAsianGames #AGwithIAS #AsianGames2023 pic.twitter.com/T51Zmpjaks
— India_AllSports (@India_AllSports) September 29, 2023
विशेष म्हणजे, किरणने 72 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी पहिला-वहिला शॉटपूट म्हणजेच गोळाफेक खेळात पदक जिंकले आहे. यापूर्वी बारबरा वेबस्टर हिने 1951मध्ये कांस्य पदक जिंकले होते.
Indian athletes continue to shine at the Asian Games 2022!
A big congratulations to the exceptional Kiran Baliyan for her amazing achievement in the Shot Put event and winning the Bronze Medal. Her success has delighted the entire nation. pic.twitter.com/EsNQyRzqRB
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2023
किरणसाठी 2023 वर्ष शानदार
किरणसाठी 2023 हे वर्ष खूपच शानदार राहिले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जलवा दाखवण्यापूर्वी किरणने मागील महिन्यात चंदीगड येथे इंडियन ग्रां प्री5मध्ये 17.92 मीटर गोळा फेकत नवीन वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम केला होता. या विक्रमासह किरण भारताची सार्वकालीन तिसरी सर्वोत्तम महिला गोळाफेक खेळाडू बनली. (medal for india asian games 2023 kiran baliyan wins bronze medal in womens shot put)
हेही वाचा-
भारताच्या ‘सोन’पऱ्या! Asian Gamesमध्ये देशाच्या खात्यात ‘सुवर्ण’ पदकांचा पाऊस, सिफ्तने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड
कधी, कुठे आणि कसा पाहता येईल IND vs ENG संघातील सामना? एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती