मुंबई । भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांची मुलगी आरुनी कुंबळे ही खूपच प्रसिद्ध आहे. आरुनी आणि कुंबळे यांच्यात खूप चांगली ‘बॉन्डिंग’ असल्याने कुणालाही वाटत नाही की आरुनी ही अनिल कुंबळेची सावत्र मुलगी आहे. अनिल कुंबळे त्यांची मुलगी आरुनी हिच्यासोबतच शॉपिंगला जात असतात.
अनिल कुंबळेने चेतना नावाच्या घटस्फोटीत महिलेशी विवाह केला होता. यासोबत त्याने त्याच्या घटस्फोटीत पत्नीच्या पहिल्या लग्नाची मुलगी आरुनी हिला स्वीकारले. सोबतच तिला स्वतःचे नाव देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ही गोष्ट फारच कमी लोकांना माहित आहे की, अनिल कुंबळे हे 1998 ते 2004 पर्यंत मुलगी आरुनी हिला आपल्याकडे कस्टडीत (आपल्याबरोबर घेण्यासाठी) न्यायालय लढा देत असलेला पत्नीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता.
आरुणीला स्वतःचे नाव देणे, तिचे पालन पोषण करणे, योग्य प्रकारचे शिक्षण देत असल्याचे पाहून कोर्टाने त्यांचे कौतुक केले होते. एक चांगला पती होण्याबरोबरच एक चांगला पिता देखील आहे. हे या उदाहरणावरून कुंबळेने स्वतःला सिद्ध केले होते.
आरुणीने सीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. या सोबतच तिने भरतनाट्यम नृत्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. अरुणाने यापूर्वी सोशल मीडियावर तिचे पहिले वडील जहागीरदार आणि दुसरे वडील अनिल कुंबळे या दोघांवर तिचे खूप प्रेम करत असल्याचे सांगितले होते.