---Advertisement---

आरसीबीची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतमबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? वाचा सविस्तर

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 11:54 AM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (आरसीबी) सोमवारी (२० सप्टेंबर) अबूधाबी येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नऊ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीचे चाहते या मानहानीकारक पराभवामुळे निराश झाले होते. तर, दुसरीकडे वेगवान गोलंदाज कायले जेमीसन आरसीबीची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतमसोबत ‘फ्लर्टिंग’ करून चर्चेत आला.

जेव्हा आरसीबीची धावसंख्या ५३ वर ४ गडी बाद अशी होती, तेव्हा कॅमेरामनने डगआऊटकडे कॅमेरा वळवला. जेथे जेमिसन पॅडअप होऊन बसला होता. कारण, त्याला आठव्या क्रमांकावर खेळायचे होते. जेव्हा कॅमेरा जेमीसनवर होता, तेव्हा तो डगआउटमध्ये बसलेल्या नवनीता गौतमकडे बघून हसत होता. कॅमेऱ्याने जेमीसनचे हाव भाव पकडताच हे फुटेज व्हायरल झाले आणि चाहत्यांना नवनीताबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.

कोण आहे नवनीता?

नवनीता गौतमचा जन्म ११ एप्रिल १९९२ मध्ये व्हँकुव्हर येथे झाला. नवनीता गौतम कॅनेडियन आहे. नवनीता २०१९ मध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून आरसीबीमध्ये सामील झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी आठ आयपीएल संघांपैकी कोणत्याही सपोर्ट स्टाफचा भाग असणारी ती पहिली आणि एकमेव महिला होती.

आरसीबीमध्ये सामील होण्यापूर्वी नवनीताने ग्लोबल टी२० कॅनडामध्ये टोरंटो नॅशनल संघासोबत काम केले होते. तसेच तिने आशिया कप मोहिमेदरम्यान भारतीय महिला बास्केटबॉल संघासाठी सहाय्यक कर्मचारी सदस्य म्हणून काम केले आहे.

नवनीता गौतमला २०१९ मध्ये जेव्हा विचारण्यात आले की तिला आरसीबीमध्ये सपोर्ट स्टाफचा एकमेव महिला असण्यामुळे काही भीती वाटते का ? तेव्हा ती म्हणाली होती, ‘बिलकुल नाही. हे म्हणजे प्रत्येक वेळी माझ्या जवळपास २० भाऊ असण्यासारखे आहे. माझा विश्वास आहे की, जोपर्यंत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तुमच्या कामावर विश्वास आहे तोपर्यंत लिंग ही समस्या असू नये. कारण, आम्ही सर्व आरोग्यसेवा देणारे व्यावसायिक आहोत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---