ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ कॉमनवेल्थ गेम्सच्या (Cricket In Commonwealth Games)२२व्या हंगामाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या साखळी सामन्यात बार्बाडोसचा ७१ चेंडू शिल्लक राखत ९ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात बार्बाडोसने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६४च धावा केल्या. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १ विकेट गमावत ८.१ षटकातच सामना जिंकला. त्यांच्या या विजयाची स्टार फिरकीपटू एलाना किंग राहिली. तिने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. मात्र कर्णधार मेग लॅनिंगच्या एका चूकीमुळे तिची हॅट्ट्रीकची संधी हुकली. त्यामुळेे लॅनिंगही निराश झाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बार्बाडोसने प्रथम फलंदाजी करताना १४व्या षटकापर्यंत ६ विकेट्स गमावत ५३ धावा केल्या. मात्र त्याच्या पुढच्या षटकात त्यांच्या अडचणीत अजून वाढ झाली. फिरकीपटू एलाना किंग (Alana King) हिने चौथ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. तिला पुढच्या चेंडूवर हॅट्ट्रीक मिळाली असती, मात्र फलंदाजाने हवेत मारलेल्या त्या शॉटचा सोपा झेल मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने सोडला. जर हा झेल पकडला असता तर एलाना ऑस्ट्रेलियाकडून टी२०मध्ये हॅट्ट्रीक घेणारी दुसरीच महिला खेळाडू ठरली असती.
कर्णधाराने झेल सोडल्याने एलानाची हॅट्ट्रीक हुकली
तो झेल सोडल्याने लॅनिंग निराश दिसली. या सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मला वाईट स्वप्न येतील. झेल सोडल्याने वाटत होते खड्डा खोदून त्याच्यात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर उडी घेऊ. मी पूर्णपणे प्रयत्न केला होता, मात्र झेल अखेर सुटलाच. याचे मला खूप वाईट वाटले असून एलानासाठी मी दुखी आहे. तिने अप्रतिम गोलंदाजी केली, पण माझ्याकडून निराशा झाली. क्रिकेटमध्ये असे होतच राहते.
विलन झाली हिरो, लॅनिंगने झटपट केल्या ३६ धावा
ऑस्ट्रेलियाची कर्णधार आपल्या गोलंदाजासाठी शत्रू ठरली असली, तरी तिने फलंदाजीच त्याची उणीव भरून काढली. लॅनिंगने २१ चेंडूत ३६ धावा केल्या. यामुळे संघाने ९ विकेट्सने विजय मिळवला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट, तर दुसऱ्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अगोदर पिता आणि आता पती बनलाय ‘हा’ क्रिकेटपटू, थाटात पार पडलं शुभमंगल
शिखर धवनचा हट्टी शेफ! मालक सुट्टी देत नव्हता, पण तरीही घेतलीच
ना पाऊस ना वारा, तरीही भारत-विंडिज सामना लेट होणार, कारण वाचून हसून लोटपोट व्हाल