---Advertisement---

२३३ वर्षांचा क्रिकेट इतिहास एका झटक्यात बदलला, पहिल्यांदाच एमसीसीने घेतला असा निर्णय

On: गुरूवार, जून 25, 2020 4:44 PM
---Advertisement---

मुंबई । क्रिकेटमधील नियम बनवणारी आणि त्याचा प्रचार प्रसार करणारी संस्था मेरिलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने आपला दोनशे वर्षांचा इतिहास बदलून टाकला आहे. एमसीसीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला खेळाडूची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडची माजी खेळाडू आणि कर्णधार क्लेयर कोनोर हिची मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेत.

मेरिलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) हे लंडनमधील क्रिकेट क्लब आहे. याची 1787 साली  स्थापना साली झाली. या क्लबला 233 वर्ष पूर्ण झाले आहेत. दोनशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेल्या या क्लबने पहिल्यांदाच अध्यक्षपदाची जबाबदारी एका महिला खेळाडूंकडे सोपवली आहे. क्लेअर पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये महिन्यांमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संघकारा याच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे घेतील. सध्या कुमार संगकारा मेरिलबोन क्रिकेट क्लबच‍ा अध्यक्ष आहे .

बुधवारी क्लबची वार्षिक सर्वसाधारण बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. त्यात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. क्लेयर कोनोर यांना आता मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या सदस्यांची मंजुरी घेणे आवश्यक आहे.

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे कुमार संगकारा यांचा एक वर्षासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. संगकारा पुढील वर्षी या पदावरून कार्यमुक्त होतील. त्यानंतर कोनोर अध्यक्षपदाचा पदभार संभाळतील. या निवडीबाबत कोनोर म्हणाल्या की, ” एमसीसीच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव घोषित केल्याने मी खूपच आनंदीत आहे. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. या पदामुळे माझा अधिक सन्मान वाढणार आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---