---Advertisement---

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व, 14 वर्षांत केवळ इतके पराभव

On: मंगळवार, डिसेंबर 24, 2024 4:35 PM
mcg
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. पर्थ येथील पहिली कसोटी भारतानं जिंकली, तर ऑस्ट्रेलियानं ॲडलेडमध्ये पुनरागमन करत पिंक बॉल कसोटी जिंकली. तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे आता चौथा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं आहे. गेल्या काही वर्षातील रेकॉर्ड पाहिल्यास मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन संघानं विरोधी संघावर वर्चस्व गाजवलंय. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियानं ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये भारतावर दबाव आणला होता बहुतेक सामन्यात ते पुढे होते. मात्र, भारतीय संघानं ब्रिस्बेनमध्ये जोरदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 100 धावांच्या आत सात विकेट्स गमावल्या. मात्र, मेलबर्नमध्ये रोहितच्या संघासाठी अडचणी अधिक असणार आहेत.

चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय कॅम्पमध्ये विविध वादांनी खळबळ उडवून दिली आहे. विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियन मीडियाला विमानतळावर फोटो काढण्यापासून रोखलं, जडेजानं इंग्लिश रिपोर्टला प्रतिसाद दिला नाही आणि त्यानंतर सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्टीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, या मैदानावर ऑस्ट्रेलियानं 116 कसोटी सामने खेळले आहेत. 1877 मध्ये येथे पहिली कसोटी खेळली गेली. ऑस्ट्रेलियन येथे एकूण 67 सामने जिंकले असून 32 सामने गमावले आहेत, तर 17 सामने अनिर्णित राहिले. 2010 पासून ऑस्ट्रेलियानं एकूण 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी नऊ जिंकले आहेत, तीन हरले आहेत आणि दोन अनिर्णित राहिले आहेत.

मेलबर्नमध्ये गेल्या 14 वर्षांत ऑस्ट्रेलियानं जे तीन सामने गमावले, त्यापैकी दोन भारतानं जिंकले आहेत. 2018 आणि 2020 मध्ये येथे भारतानं बाजी मारली होती. यापूर्वी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाला या मैदानावर एक डाव आणि 157 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता.

हेही वाचा – 

रोहित शर्मानंतर भारताचा पुढील कर्णधार कोण होणार? धक्कादायक दावा समोर
“मी खूप निराश आहे, कारण….”; दोन ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या मनू भाकरने व्यथा मांडली
6,6,6,6,6….सोलापूरच्या वाघिणीने हाणले सलग 5 षटकार! जबरदस्त व्हिडिओ एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---