ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ देखील जागतिक क्रिकेटमधील सर्वात मजबूत आणि यशस्वी संघात गणला जातो. विशेषता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न हे शहर क्रिकेटसाठी सुप्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, मेलबर्नमध्ये भारतीय क्रिकेटपटूंची लोकप्रियता ही कदाचित जगात सर्वाधिक आहे. दरम्यान, नुकतीच बातमी समोर येत असून लवकरच या शहरातील रस्त्यांना विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंची नावे देण्यात आली आहेत.
इंग्लंडच्या बार्मी आर्मीने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. वास्तविक, मेलबर्न येथील सॅटलाइट सिटी रॉकबॅक येथे एक गृहनिर्माण संकुल तयार केले जात आहे. या संकुलातील, रस्त्यांना दिग्गज क्रिकेटपटूंची नावे दिली जात आहेत. ‘तेंडुलकर ड्राइव्ह’, ‘कोहली क्रिसेन्ट’ आणि ‘देव टेरेस’ अशी नावे खरेदीदारांना आकर्षित करत आहेत.
या एकूणच परिसराची निर्मिती करणारे खुर्रम सईद हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते म्हणाले की, यापूर्वी 60 क्रिकेटपटूंची नावे मेलबर्न शहरातील मेल्टन कौन्सिलला पाठविली गेली होती. आम्हाला तेंडुलकर आणि कोहलीच्या नावांची मान्यता मिळाली आहे.
Look at this new housing estate in Melbourne, we'll pretend we're shocked there is no 'Cook Corner' or Strauss Street 🙄
Great spot, @DennisCricket_ 👏 pic.twitter.com/t4lXpUoXVT
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) May 24, 2021
सईद म्हणाले, “भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा माझा सर्वात आवडता फलंदाज आहे आणि त्यामुळे मी इथल्या सर्वात महागड्या भागाच्या रस्त्याचे नाव त्याच्या नावावर ठेवले आहे.” सईदने हे देखील स्पष्ट केले की परवानगी न मिळाल्यामुळे माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी व राहुल द्रविड यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.
सईद म्हणाला की, या निवासी संकुलातील रस्त्यांना इतर देशांतील क्रिकेटपटूंचीही नावे देण्यात आली आहे. यात ‘वॉ स्ट्रीट’, ‘मियाँदाद स्ट्रीट’, ‘अँम्ब्रोज स्ट्रीट’, ‘सोबर्स ड्राइव्ह’, ‘कॅलिस वे’, ‘हॅडली स्ट्रीट’ आणि ‘अक्रम वे’ यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने कर्णधाराचा ओरडा खावा लागला होता”
तेलही गेले अन् तूपही! पोलिस कोठडीत असलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारवर अजून एक संकट
‘त्या’ वेळी झालो होतो बेचैन, दीर्घ प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सूर्यकुमारचा खुलासा