मुंबई इंडियन्स, आयपीएल इतिसाहातील सर्वात यशस्वी संघ, ५ वेळचा आयपीएल विजेता संघ. परंतु आयपीएल २०२२ च्या हंगामात याच मुंबई संघाची गाडी रुळावरून घसरलेली दिसत आहे. शनिवारी (१६ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात हंगामातील २६ वा सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई संघाची हाराकिरी पाहायला मिळली. त्यांनी १८ धावांनी हा सामना गमावला. हा त्यांचा हंगामातील सलग सहावा पराभव होता. यानंतर सोशल मीडियावर मुंबई संघाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
अनेकांनी ट्वीटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मुंबई संघावर (Mumbai Indians) निशाणा साधला आहे. तर अनेकांनी मजेशीर मीम्स व्हायरल केले (Memes On Mumbai Indians) आहेत. काहींनी कर्णधार रोहित शर्मावरही मीम्स बनवले (Memes On Rohit Sharma) आहेत. एका चाहत्याने मुंबईच्या सहाव्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे की, ‘ऊँची दुकान, फिके पकवान.’
तसेच एका ट्वीटर वापरकर्त्याने पुढील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ देत म्हटले आहे की, ‘कर रे बाबा कुछ तो, नेक्स्ट मॅछ सीएसके के साथ है, इज्जत रख.’
https://twitter.com/FakeUncleji/status/1515330890196467715?s=20&t=ZYkxfSsi1hGkh4HCs8Eyow
https://twitter.com/SidhwaniAvish/status/1515331721801076736?s=20&t=kEtotrqzMQ8q_DIUPnbP2A
— 𝐇𝐲𝐫𝐚𝐡 (@Hyrah_OnMission) April 16, 2022
Kar re baba kuch toh, next match CSK ke sath hain 🙏 ijjat rakhna 🤌🏻
— Khushali (@hippiekhush) April 16, 2022
https://twitter.com/Omnipresent090/status/1515330850728022019?s=20&t=kTd_uaIr5-Yl8NFJed_2YA
MI right now : #MIvsLSG pic.twitter.com/SJQQbNNrwr
— Raghav Masoom (@comedibanda) April 16, 2022
😭 #MumbaiIndians #MIvsLSG #IPL2022 pic.twitter.com/pWkKfe4F7i
— Drowsy guy (@the_drowsyguy) April 16, 2022
#MIvsLSG #MumbaiIndians to other teams: pic.twitter.com/PM1bBeOBU0
— Captain Levi (@captLevi_) April 16, 2022
#MIvsLSG pic.twitter.com/CBIN8MAlhZ
— Anoop 🇮🇳 (@ianooop) April 16, 2022
After six consecutive defeats #MIvsLSG pic.twitter.com/rQJeGjlLcC
— ପାର୍ଥ ମୋଦୀ (@elLjfrn8DVxyEb6) April 16, 2022
#MIvsLSG
Mumbai Indians be like* Thori si to lift Kara de. pic.twitter.com/E9sBrefSeT— Zeyaul Mustfa (@Zeyaul404) April 16, 2022
After losing another match
#MIvsLSG #MumbaiIndians pic.twitter.com/v6boY5FtXf
— Mota bhai (@MotaBhai03) April 16, 2022
https://twitter.com/cricketinside_r/status/1515330868839317506?s=20&t=J3ccUQYLpALktsuM5kxRMg
https://twitter.com/Jitendra0917/status/1515330862233006080?s=20&t=mVVZiE2bDFaVOCFpr3meew
दरम्यान या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians) नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत लखनऊला (Lucknow Super Giants) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी लखनऊने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या होत्या. लखनऊच्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघ ९ विकेट्स गमावत फक्त १८१ धावाच करू शकला.
मुंबईचे फलंदाज पुन्हा एकदा या सामन्यात फेल ठरले. मुंबईकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा फक्त ६ धावाच करू शकला. एकाही फलंदाजाला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठी धावांची खेळी करता आली नाही.
https://www.instagram.com/p/CcajOzZpTBw/?utm_source=ig_web_copy_link
यावेळी लखनऊ संघाकडून गोलंदाजी करताना आवेश खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ३ विकेट्स खिशात घातले. त्याच्याव्यतिरिक्त जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने सलामीला फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूपर्यंत संघाचा किल्ला लढवला. यावेळी राहुलने ६० चेंडूंचा सामना करताना नाबाद १०३ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने ५ षटकार आणि ९ चौकारही चोपले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलचे शतक आणि आवेश खानची शानदार गोलंदाजी; मुंबईला १८ धावांनी नमवत लखनऊ विजयी
मुंबईच्या सामन्यासाठी ‘तेंडूलकर कुटुंबा’ची हजेरी, अंजली आणि सारा तेंडूलकर ठरल्या चाहत्यांचे आकर्षण