---Advertisement---

चुना लगा दिया! गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपद राजीनामाच्या प्रँकनंतर चाहत्यांकडून मीम्सची बरसात

Sourav-Ganguly-Memes
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याने बुधवारी (०१ जून) बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्याचे संकेत दिले होते. आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून ट्वीट करत त्याने याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर सोशल मीडियावर गागुंलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधान आले होते. परंतु बीसीसीआय सचिन जय शहा याने गांगुली असे काही करणार नसल्याचे सांगत सत्य पुढे आणले. यानंतर ट्वीटरवर चाहत्यांनी मीम्स शेअर करत गांगुलीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

काय होते गांगुलीचे ट्वीट?
गांगुलीने (Sourav Ganguly) बुधवारी संध्याकाळी ट्वीट करत लिहिले (Sourav Ganguly Retirement) होते की, “माझ्या क्रिकेट प्रवासाला १९९२ मध्ये सुरुवात केली होती. आता २०२२मध्ये कारकीर्दीचे ३०वे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. मी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छितो जो या प्रवासाचा एक भाग आहे, मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे, तिथे पोहोचण्यास मदत केली. आज, मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याने मला वाटते की, कदाचित बऱ्याच लोकांना मदत होईल. मला आशा आहे की, माझ्या आयुष्याच्या या नवीन प्रवासात तुमचा पाठिंबा कायम राहील.”

त्यानंतर गांगुली क्रिकेट प्रशासनातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. मात्र जय शहाने सत्य सांगत या चर्चांना पूर्णविराम लावला. त्यानंतर चाहत्यांनी गांगुलीवर मीम्स बनवत त्याला ट्रोल (Sourav Ganguly Trolled) केले आहे. तसेच काहींनी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावरही निशाणा साधला आहे. 

येथे पाहा मीम्स-

https://twitter.com/ritik_16500/status/1531985678988238848?s=20&t=0dz5gn79B4WdfhMapHU_nQ

https://twitter.com/move123456789/status/1531988255545360384?s=20&t=igfG6MpYfZTOgpQictZNYg

https://twitter.com/ILoveYouJanu69/status/1531983971071848448?s=20&t=JQvMof_6LKRcKSkmzKP0ww

सौरव गांगुली यांची ऑक्टोबर २०१९मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते. एक कर्णधार म्हणून त्यांनी भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेले. यानंतर, व्यवस्थापनात येताच त्यांनी असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा भारतीय क्रिकेटला खूप फायदा झाला. अलीकडेच, आयपीएल संपल्यानंतर, त्यांनी सर्व मैदानावरील ग्राउंड स्टाफसाठी बक्षीस रक्कम जाहीर करून सर्वांची मने जिंकली होती.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियात सामील होण्याआधी केएल राहुलची बहारिनच्या खेळाडूच्या लग्नात धमाल, Photo होतायेत व्हायरल

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; आठपैकी दोन सामने होणार अमेरिकेत

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज: स्वरा जावळे, काव्या पांडे, वीरा हरपुडे, सृष्टी सूर्यवंशी यांची आगेकूच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---