एशिया कप (Asia Cup) स्पर्धेच्या 15व्या हंगामातील दुसरा सामना आज रविवारी (28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सांयकाळी ७.३०वाजता खेळला जाणार आहे. या सामन्याआधीपासूनच क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. तर या सामन्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्व खेळाडू काळ्या रंगाचा आर्मबॅंड बांधून मैदानात उतरणार आहेत.
पाकिस्तानचे क्रिकेटपटू एशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात काळ्या रंगाचा आर्मबॅंड त्यांच्या देशवासियांसाठी घालणार आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी आपली एकात्मता आणि सहाय्य दर्शवण्यासाठी ते भारताविरुद्धच्या सामन्यात दंडाला काळ्या रंगाची पट्टी बांधणार आहेत.
सध्याची पाकिस्तानमधील भौगोलिक स्थिती भयानक आहे. तेथे 3 कोटींपेक्षा अधिक लोक बेघर झाली आहेत. जवळपास 1000पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडली आहेत. तर पाच लाखांपेक्षा अधिक घरे उधवस्त झाली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक, जीवितहानी आणिि वित्तहानी झाली आहे.
बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच भारताविरुद्धचा सामना जिंकत पाकिस्तान त्यांच्या देशवासीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याच्या हेतूनेच मैदानात उतरेल.
या स्पर्धेत सहा संघाचा सहभाग असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली आहे. अ गटामध्ये भारत, पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांचा समावेश आहे, तर ब गटात श्रीलंका, अफगानिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. तर या दोन गटातील पहिले दोन संघ सुपर4 मध्ये खेळतील.
अफगानिस्तानने यजमान संघ श्रीलंकेचा सहज पराभव करत स्पर्धेची चांगली सुरूवात केली आहे. त्यांनी शनिवारी (२७ ऑगस्ट) श्रीलंकेचा ८ विकेट्सने मोठा पराभव केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लेडी रनमशीन मिताली आता करणार ‘राज’कारण! भाजप प्रवेशाची चर्चा
आशिया चषकाच्या धामधूमीत टीम इंडियाच्या ‘राहुल’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठं समर्थन! ‘गांधी’ परिवारातून खास शुभेच्छा