मुंबई:- अमर क्रीडा मंडळ, सिद्धीप्रभा फाऊंडेशन, ओम् पिंपळेश्वर मंडळ, अंकुर स्पोर्टस् यांनी विजय नवनाथ मंडळाने आपल्या “अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त आयोजित पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारी असलेल्या मैदानावर झालेल्या उदघाटनिय सामन्यात काळाचौकिच्या अमर मंडळाने लोअर परेलच्या यंग विजयला ५५-२५ असे सहज नमवित विजयी सलामी दिली. आक्रमक सुरुवात करीत पहिल्या डावात २९-१२अशी आघाडी घेणाऱ्या अमरने दुसऱ्या डावात तोच जोश कायम राखत गुणांचे अर्धशतक पार केले. नितीन विचारे, करण सावर्डेकर यांच्या चढाई पकडीच्या जोशपूर्ण खेळाला या विजयाचे श्रेय जाते. यंग विजयच्या अनिकेत गावडेचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला.
प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा फाऊंडेशन ने करिरोडच्या अशोक मंडळाचा प्रतिकार ४६-३३असा मोडून काढला. सिद्धार्थ भोसले, रुपेश साळुंखे यांनी झंझावाती सुरुवात करीत पूर्वार्धात ३५-१५ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात सुर सापडलेल्या अशोक मंडळाच्या संतोष ठाकूर, साईराज कदम यांनी आपला खेळ उंचावत सामन्यात रंगत आणली. ओम् पिंपळेश्वरने सूर्यकांत व्यायाम शाळेला ३६-१६ असे लीलया नमवित आगेकूच केली. ओमकार जाधव, चेतन गावकर ओम् पिंपळेश्वरकडून उत्कृष्ट खेळले. सूर्यकांतचा सिद्धेश आर्डे बरा खेळला.
शेवटच्या सामन्यात सातरस्त्याच्या अंकुर स्पोर्टस् ने प्रभादेवीच्या विकास मंडळावर ४६-३३ अशी मात केली. मध्यांतराला २५-१५ अशी आघाडी घेणाऱ्या अंकुरने नंतर देखील त्याच जोमाने खेळ करीत आपला विजय साकारला. अभिमन्यू पाटील, राकेश भोसले यांच्या चढाई पकडीच्या खेळाने अंकुरने १३गुणांच्या फरकाने विजय साकारला. विकास कडून अवधूत शिंदे, राकेश सिंग ने बरी लढत दिली. या अमृत महोत्सवी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मंत्री विभागीय आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार सचिन आईर, आमदार सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. (Men’s First Division District Level Kabaddi Tournament. Amar Krida, Siddhiprabha, Om Pimpleswar, Ankur Sports take a victory salute.)
महत्वाच्या बातम्या –
U19 World Cup Final : अंडर 19 वर्ल्ड कपच्या पराभवाची ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे; वाचा सविस्तर
‘सामना जाऊ दे, शिकून घे…’, अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलवेळी भारतीय खेळाडूंमध्ये चर्चा, पाहा VIDEO