भारताने 15व्या हॉकी विश्वचषक (Hockey World Cup)2023च्या स्पर्धेत विजयी सुरूवात केली आहे. डी ग्रुपमध्ये असलेल्या भारताने पहिल्या सामन्यात स्पेनचा 2-0 असा पराभव केला होता. आता यजमानांचा दुसरा सामना रविवारी (15 जानेवारी) इंग्लंड विरुद्ध आहे. हा सामना रौरकेलामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत भारताचे उपांत्यपूर्व फेरीत जाण्याचे स्वप्न आहे, कारण वेल्सला पराभूत करणे भारतासाठी सोपे आहे. दुसरीकडे इंग्लंडने पहिल्या साखळी सामन्यात वेल्सचा 5-0 असा पराभव केला आहे.
स्पेनविरुद्धच्या सामन्यात अमित रोहिदास (Amit Rohidas) आणि मिडफिल्डर हार्दिक सिंग (Hardik Singh) यांनी गोल केले होते. त्याचबरोबर गोलकीपर कृष्णा पाठक यानेही चांगली कामगिरी करत स्पेनचे अनेक हल्ले रोखले.
दुसऱ्या सामन्यात इंग्लंड भारताला चांगली टक्कर देईल कारण जागतिक क्रमवारीत इंग्लंड पाचव्या आणि भारत सहाव्या क्रमांकावर आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये हे दोन्ही संघ समोरा-समोर आले होते तेव्हा सामना 4-4 असा बरोबरीत राहिला होता. यावरून भारताचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले, कॉमनवेल्थ गेम्समध्ये इंग्लंडचा खेळ पाहून त्यांच्याविरुद्धचा सामना नक्कीच कठीण होणार आहे. यामुळे आम्ही स्पेनविरुद्ध जसा खेळ केला तसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पहिल्या सामन्यात भारताची मिडफिल्ड (मनप्रीत सिंग, हार्दिक, आकाशदीप सिंग) तर डिफेंसही चांगला होता. दुसरीकडे इंग्लंडच्या हॉकीनेही आक्रमक खेळण्याचा निर्धार केला असून ते पहिल्या सामन्यातच दिसले. मात्र पेनल्टी कॉर्नर ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. मागील 12 पैकी 10 संधी त्यांनी गमावल्या. यामुळे भारताला
आमने-सामने
विश्वचषकात शेवटी भारत आणि इंग्लंड 2014मध्ये समारोसमोर आले होते. तेव्हा इंग्लडने 2-1 असा विजय मिळवला होता. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धेत एकूण 21 सामने खेळले गेले. भारत 10 सामने जिंकत आघाडीवर असून इंग्लंडने 7 सामने जिंकले आहेत. तसेच 4 सामने अनिर्णीत राहिले. त्याचबरोबर 2022मध्ये 3 सामने खेळले गेले, ज्यातील दोन सामने अनिर्णीत राहिले, तर एक सामना भारताने जिंकला.
दोन्ही संघ-
भारत- पीआर श्रीजेश (गोलकीपर), कृष्णा पाठक (गोलकीपर), जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), निलम संजीप एक्सेस, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग , मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग.
इंग्लंड- डेविड एम्स (कर्णधार), जेम्स अल्बेरी, लियाम अँसेल, निक बंडुराक, विल कॅलनन, डेविड कॉन्डोन, डेविड गुडफिल्ड, हॅरी मार्टिन, जेम्स माझारेलो (गोलकीपर), निकलस पार्क, ऑली पायने (गोलकीपर), फिल रोपर, स्कॉट रश्मेरे, लियाम सॅनफोर्ड , टॉम सोर्सबी, झॅक वॉलेस, जॅक वॉलर, सॅम वार्ड
(Men’s Hockey World Cup 2023 INDvENG preview)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच
कोण आहे तो भारतीय धुरंधर ज्याने उडवलीये फाफ डू प्लेसिसची रात्रीची झोप? माजी कर्णधारानेच केलाय खुलासा