बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) आयसीसीने पुरुष टी20 क्रिकेटमधील फलंदाजी रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. त्याने टी20 फलंदाजी रँकिंगमध्ये सर्वाधिक गुण मिळवत अव्वलस्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, हे कोणत्याही भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत. त्यामुळे सूर्यकुमार टी20 रँकिंगमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.
सूर्यकुमार टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सर्वाधिक 910 गुणांसोबत टी20 फलंदाजी रँकिंगमध्ये अव्वलस्थान गाठले आहे. मागील रँकिंगमध्ये सूर्याचे 890 गुण होते. मात्र, यावेळी त्याला 20 गुणांचा फायदा झाला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डाव सांभाळत 26 धावा केल्या होत्या. तसेच, संघाला विजयही मिळवून दिला होता. त्याला या खेळीचा फायदा थेट रँकिंगमध्ये झाला आहे.
सार्वकालीन टी20 फलंदाजी रँकिंगमध्ये सूर्यकुमार दुसऱ्या स्थानी
दुसरीकडे, सार्वकालीन टी20 फलंदाजी रँकिंगबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडचा डेविड मलान हा अव्वलस्थानी आहे. त्याने 2020मध्ये केपटाऊन येथे 915 गुण मिळवले होते. या यादीत आता सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी आला आहे. त्याने सार्वकालीन टी20 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये 910 गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.
Surya continues to shine on the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 🔥#ICCRankings | Details ⬇️https://t.co/APBgTrIHGO
— ICC (@ICC) February 1, 2023
सूर्यकुमारने गाजवले होते 2022 वर्ष
सूर्यकुमार यादव याने मागील वर्षी 2022मध्ये टी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. तो आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक स्पर्धेतील 6 सामन्यात एकूण 239 धावा करत टी20 रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला होता. या शानदार कामगिरीसाठी त्याला मागील महिन्यात आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (mens t20i batting rankings 2023 cricketer suryakumar yadav has become the highest rated player by an indian player in t20is)
पुरुष टी20 फलंदाजी रँकिंगमधील अव्वल 5 फलंदाज
908 गुण- सूर्यकुमार यादव
836 गुण- मोहम्मद रिझवान
788 गुण- डेवॉन कॉनवे
778 गुण- बाबर आझम
748 गुण- एडेन मार्करम
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जड्डूच्या मित्राचा रणजीत धमाका; नवव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलं खणखणीत शतक
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर