---Advertisement---

Video: शिखर धवन म्हणतो कोहली-धोनी मेरे दो अनमोल रतन, एक है राम तो दूजा लखन

On: सोमवार, जून 25, 2018 7:24 PM
---Advertisement---

लंडन। भारतीय संघाचा या आठवड्यापासून 3 महिन्यांच्या आयर्लंड-इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहचला आहे.

त्याचे अनेक फोटोही खेळाडूंनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात शिखर धवननेही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ विमानातील असुन यात शिखर ‘मेरे दो अनमोल रतन एक है राम तो दूजा लखन’ हे गाणं म्हणत आहे. त्याच्या एका बाजूला एमएस धोनी बसला आहे तर विराट कोहली दुसऱ्या बाजूला उभा आहे. तसेच त्याने या व्हिडिओत धोनी आणि कोहलीच्या जोडीला राम-लखन असे नवीन नाव दिले आहे.

https://www.instagram.com/p/BkW9FzkhNOK/?taken-by=shikhardofficial

त्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की ‘मेरे दो अनमोल रतन धोनी आणि कोहली. वाईट गायनाबद्दल सॉरी.’ हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होणार आहे.

भारतीय संघ या 3 महिन्याच्या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध 2 टी20 सामने आणि इंग्लंड विरुद्ध 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हा खेळाडू म्हणतो….धोनीपेक्षा जोश बटलर लई भारी!

रोनाल्डो-मेस्सी वादात आता कोहलीची ‘विराट’ उडी; ह्या खेळाडूला म्हटले महान!

ब्रिटनमध्ये पोहचताच टीम इंडिया पहिले हे काम केले!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment