---Advertisement---

मेस्सीचा अर्जेंटिना संघ पडणार फिफा विश्वचषकातून बाहेर ?

---Advertisement---

फिफा विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणार अर्जेंटिना संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

लिओनेल मेस्सी सारखा जगातील सर्वोत्तम खेळाडू संघात असताना देखिल अर्जेंटिना संघावर ही परिस्थीती ओढावली आहे.

फिफा विश्वचषकाच्या ड गटात अर्जेंटिना, क्रोएशिया, आइसलँड आणि नायजेरीया या संघाचा समावेश आहे.

यामध्ये आइसलँड विरुद्ध झालेला अर्जेंटिनाचा पहिला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. तर अर्जेंटीनाला दुसऱ्या सामन्यात क्रोएशिया कडून 3-0 असा लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला.

या पराभवामुळे अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागत आहे. तसेच स्वत: मेस्सीदेखील दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी करू शकला नाही.  मेस्सी या स्पर्धेत एकही गोल करू शकला नाही.

अर्जेंटिना सध्या ड गटात एका गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे अजून अर्जेंटिनाला स्पर्धेत टिकून राहण्याची संधी आहे. पण त्यासाठी अर्जेंटिनाला नायजेरीया विरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

त्याचबरोबरच ड गटातील बाकीच्या सामन्यांच्या निकालावरही अर्जेंटिनाला अवलंबून रहावे लागणार आहे.

2014 च्या फिफा विश्वचषकाचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या अर्जेंटिनाला यापूर्वी  2002 च्या फिफा विश्वचषकातून पहिल्याच फेरीत बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती.

अशी आहेत अर्जेंटिनाला पुढच्या फेरीत जाण्यासाठीची समीकरणे:

– अर्जेंटिनाला नायजेरीया विरुद्ध मोठा विजय आवश्यक

– अर्जेंटिना आणि आइसलँडचे गुण सारखे. दोन्ही संघांकडे 1 गुण आहेत, पण गोल फरकामुळे आइसलँड गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी.

-त्याचबरोबर आइसलँडचे आजून दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे आइसलँडला पुढे जाण्यासाठी सामन्यात बरोबरी किंवा विजय महत्त्वाचा असेल.

– तर अर्जेंटिनाला पुढच्या फेरीत जायचे असेल तर क्रोएशिया विरुद्ध आइसलँडचा पराभव होणे गरजेचे.

– तसेच अर्जेंटिनाला अशीही आशा करावी लागेल की नायजेरीया आज होणाऱ्या सामन्यात आइसलँडला पराभूत करेल.

– जर अर्जेंटिनाने नायजेरीया विरुद्ध विजय मिळवला आणि आइसलँडने जर त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी एका जरी सामन्यात विजय मिळवला तर गोल फरकानुसार कोणता संघ पुढे जाणार याचा निर्णय होईल. त्यामुळे अर्जेंटिनाला नायजेरीयाविरुद्ध मोठा विजय अत्यंत गरजेचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

म्हणून स्टार फुटबॉलपटू मेस्सी होतोय ट्रोल…

रशियातील फिफा विश्वचषकाने बदलला इराणचा इतिहास

रशियात सुरु आहे चमचेगिरी!!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment