---Advertisement---

अर्जेंटीना पराभूत झाल्याने भारतातील मेस्सी चाहत्याने केली आत्महत्या

On: सोमवार, जून 25, 2018 5:17 PM
---Advertisement---

शुक्रवार दि. 22 जूनला फिफा विश्वचषकात आपला आवडता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा अर्जेंटीना संघ क्रोएशियाकडून पराभूत झाल्याने घर सोडून गेलेल्या केरळमधील दिनु अॅलेक्स नामक चाहत्याने अात्महत्या केली आहे.

दिनु अॅलेक्स नामक हा चाहता शुक्रवार दि. 22 जूनला अर्जेंटीनाचा क्रोएशियाकडून 3-0 आसा पराभव झाल्याने निराश होता. शुक्रवारीच सामना सपंल्यानंतर त्याने एक चिठ्ठी लिहून अर्जेंटीना पराभूत झाल्याने मी आत्महत्या करत असल्याचे लिहले होते.

शनिवार दिनांक 23 जून रोजी पहाटे अॅलेक्स घरात नसल्याच्या त्याच्या आईला लक्षात आले. त्याच्या आईने जेव्हा त्याची रूम पाहीली तेव्हा तिथे एक चिठ्ठी, अर्जेंटीना संघाचा शर्ट आणि मेस्सीचा कव्हर असलेला मोबाइल सापडला.

केरळमधील त्याच्या गावापासून दहा कि.मी असलेल्या मिनाचील नदीत त्याचा मृतदेह रविवार दि. 24 जूनला सापडला आहे.

अॅलेक्सच्या वडीलांनी पत्रकारांना सांगितले की तो मेस्सी आणि अर्जेंटीनाचा खूप चाहता होता. विश्वचषकात अर्जेंटीनाची चांगली कामगिरी होत नसल्याने अॅलेक्स निराशही होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-त्यावेळी विराट घाबरला होता; सौरव गांगुलीचे कोहलीबद्दल मोठे वक्तव्य

-टेन्शनमध्ये असलेल्या केएल राहुलला विराट-अनुष्काने केली अशी…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment