---Advertisement---

”मेस्सी असा होता ज्याचा आपण कधीही अनुभव घेतला नव्हता”, एफसी गोवाचा बचावपटू मार्क व्हॅलिएंट

Mark Valiente
---Advertisement---

एफसी गोवा क्लबचा ३५ वर्षीय बचावपटू मार्क व्हॅलिएंट (Mark Valiente) या इंडियन सुपर लीगमध्ये स्थिरस्थावर झाला आहे. युवा खेळाडू असताना बार्सिलोना अकादमीत फुटबॉलचे धडे गिरवणाऱ्या व्हॅलिएंटला भारतातील खेळण्याची शैली व फुटबॉलसाठी असलेलं वातावरण यात काहीच फरक जाणवत नाही. स्पॅनिश बचावपटू बार्सिलोनाचा युवा संघाचा कर्णधार होता आणि सध्याचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी हा त्याच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

एफसी गोवाच्या बचावपटू व्हॅलिएंटने बंगळुरू एफसीविरुद्धच्या लढतीपूर्वी मेस्सी जेव्हा बार्सिलोना अकादमीत पहिल्यांदा दाखल झाला, तेव्हाच्या आठवणींना उजाळा दिला. बार्सिलोना अकादमीत खेळाडूंना वेगवान खेळ खेळण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि तो बार्सिलोनाला समानार्थी बनला आहे. त्यावेळीच मेस्सीची गुणवत्ता ताबडतोब दिसून आली होती. तो म्हणाला,” मेस्सी १३-१४ वर्षांचा असेल जेव्हा तो आमच्या संघात दाखल झाला. तो अर्जेंटिनातून आल्यामुळे त्याला इथपर्यंत येणे सोपे नव्हते. तो पहिला सीझन खेळू शकला नाही. त्याला आमच्या खेळाच्या शैलीची सवय लावणे सोपे नव्हते, परंतु त्यानंतर, तो लाजला नाही आणि पहिल्याच मिनिटापासून त्याने खूप वेगळा खेळ केला होता, हे तुम्ही पाहू शकता.”

अनेक तज्ञांनी युवा खेळाडूचा फुटबॉलला केलेला पहिला टच हा त्याच्याकडे असलेल्या गुणवत्तेचा चांगला सूचक असल्याचे सांगितले होते. आता जवळपास दोन दशकांपासून मेस्सी हा त्या कल्पनेचा प्रतीक बनला आहे. पण त्याच्या सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक होण्याच्या प्रवासाचे व्हॅलिएंट आणि अकादमीतील इतर लोक साक्षीदार आहेत.

”मला काय आठवतेय सांगू. त्यावेळी तो दोन टचचा खेळ करायचा आणि ती आमची शैली होती. एक किंवा दोन टच करून आम्ही एकाबाजूने दुसऱ्या बाजूला जेवढ्या जलद जाता येईल, असा खेळ करायचो. तो एकाचवेळी चेंडूला ६ किंवा ८ वेळा स्पर्श करायचा आणि आम्ही दोनवेळाच स्पर्श करायचो. ते काही वेगळंच होतं, जे आम्ही कधी अनुभवले नव्हते. तो निराळाच आहे, ते तुम्ही पाहू शकता. तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळाडू होईल हे आम्हाला कधीच माहीत नव्हते पण १४ वर्षांचा लिओ असाच होता,”असेही व्हॅलिएंटने सांगितले.

बार्सिलोना अकादमीमधून खेळाडूंच्या सर्वात मोठ्या तुकड्यांपैकी एक मानल्या जाणार्‍या खेळाडूंपैकी एक असलेल्या व्हॅलिएंटने सांगितले की, तरुण खेळाडूंच्या विकासातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांना प्रशिक्षण देणे, खेळण्यासाठी भरपूर वेळ देणे.

रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स अकादमीमध्ये १९ वर्षांखालील खेळाडूंना प्रशिक्षण देणारा भारताचा माजी खेळाडू इझुमी अराटा याने तरुण प्रतिभावंत खेळाडूंचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि ही भावना त्याने व्यक्त केली आहे.

“प्रतिभा सर्वत्र आहे आणि प्रतिभाव खेळाडूंची संख्या खूप जास्त आहे. या देशातील सर्व भागांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त अतिरिक्त मेहनत करणे आवश्यक आहे आणि मला वाटते की रिलायन्स फाऊंडेशन देशभरातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा शोधण्यासाठी अनेक शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये प्रतिनिधी ठेवून एक उत्कृष्ट काम करत आहे. आम्हाला अशा प्रकारच्या दूरदृष्टी असलेल्या आणखी अकादमींची गरज आहे, ” असे अराटा म्हणाला.

हिरो आयएसएलच्या या मोसमात अधिकाधिक तरुण खेळाडूंना खेळण्यासाठी वेळ मिळू लागल्याने प्रशिक्षकांद्वारे नवीन वेळापत्रकामधील विश्रांती काळाचा पुरेपूर वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. २५ वर्षांखालील २२ खेळाडूंनी या हंगामात आयएसएलमध्ये पदार्पण केले आहे आणि त्यापैकी २० भारतीय खेळाडू आहेत. जे भारतातील प्रतिभावान युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ प्रदान करण्याच्या हिरो आयएसएलच्या उद्दिष्टांची पूर्तता करते. (“Messi was something we had never experienced,” FC Goa defender Mark Valiente said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“शिखर 2023 च्या विश्वचषकात नक्कीच खेळेल” संघ सहकारी अजूनही आश्वस्त
VIDEO: आयपीएल संघांनो सावधान! ऋतुराजने एका ओव्हरमध्ये ठोकलेत तब्बल 7 षटकार 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---