---Advertisement---

‘कतार वर्ल्डकप शेवटचा’, मेस्सीचे निवृत्तीबाबत मोठे भाष्य

Lionel Messi
---Advertisement---

दिग्गज फुटबॉलपटू लियानल मेस्सी याने कतार येथील विश्वचषक हा त्याचा शेवटचा विश्वचषक असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी कतार येथे फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तर अर्जेंटिनाच्या या 35 वर्षीय खेळाडूचा हा पाचवा विश्वचषक आहे.

स्टार फुटबॉलर लियोनल मेस्सी (Lionel Messi) याने एका मुलाखतीमध्ये तो विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार हे सांगितले आहे. तो म्हणाला, “मी आधीच निर्णय घेतला आहे आणि संघाला तसे सांगितले देखील आहे, की हा माझा शेवटचा विश्वचषक असणार आहे.”

“मी विश्वचषकाचे दिवस मोजत असून त्यासाठी उत्सुकही आहे आणि चिंताग्रस्त देखील आहे. चिंता कारण हा माझा शेवटचा विश्वचषक असणार आहे. त्यासाठी मी माझा उत्तम खेळ करणार आहे,” असेही मेस्सीने पुढे म्हटले आहे. मेस्सी प्रथमच त्याच्या निवृत्तीबाबत उघडपणे बोलला आहे, मात्र त्याने कतारचा विश्वचषक संपल्यावर लगेच निवृत्ती घेणार की नाही हे स्पष्ट केले नाही. तसेच तो भविष्यात कोणत्या क्लबकडून खेळणार हे देखील निश्चितपणे सांगितले नाही. मेस्सी सध्या पॅरीस सेंट जर्मन या क्लबकडून खेळत आहे.

मेस्सीने अर्जेंटिनासाठी चार विश्वचषक खेळले आहेत. त्याने 2005मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत एकूण 164 सामने खेळले असून 90 गोल केले आहेत, मात्र त्याला एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही. तसेच त्याने मागील वर्षी राष्ट्रीय संघाला कोपा अमेरिका या स्पर्धेचे विजेतेपद जिंकून दिले आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझिलचा 1-0 ने पराभव केला होता. या स्पर्धेत त्याने चार गोल केले होते.

अर्जेंटिना संघाला 2014मध्ये विश्वचषक जिंकण्याची संधी होती. या स्पर्धेत मेस्सीने चांगली कामगिरी केली होती, मात्र अंतिम सामन्यात जर्मनीकडून पराभव स्विकारावा लागला. त्याने 2014च्या फिफा विश्वचषक, 2015 आणि 2021चा कोपा अमेरिका या स्पर्धांचे सर्वोत्कृष्ठ खेळाडूंचा पुरस्कार जिंकला आहे. त्याने 2014च्या विश्वचषक स्पर्धेत चार वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता.

सध्या अर्जेंटिनाने मागील 35 सामन्यात एकही पराभव स्विकारला नाही. त्याचबरोबर मेस्सी हा राष्ट्रीय आणि क्लबसाठी खेळताना जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अर्जेंटिनाकडे इटलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. इटलीने 2018 ते 2021मध्ये लागोपाठ 37 सामने जिंकले आहेत. त्यांचा हा विक्रम अर्जेंटिना कदाचित विश्वचषकात मोडेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: काय सांगता, संजू सॅमसनने वनडेमध्ये सरासरीत विराट-धोनीला टाकले मागे
INDvSA: आठवाच वनडे खेळणाऱ्या संजूचा कॅप्टन कूलच्या ‘त्या’ विक्रमाला धक्का! द्रविड, पंतला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---