विजय हजारे ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र विरुद्ध बंगाल हा उपांत्यपूर्वफेरीचा सामना १५मार्च रोजी दिल्ली येथे होणार आहे. महाराष्ट्राने साखळी फेरीमध्ये जबदस्त खेळ करून ब गटात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर राहिला होता. विजय हजारे ट्रॉफीच्या अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या लढती १२ मार्च पासून दिल्ली येथे सुरु होत आहेत.
महाराष्ट्राचं नेतृत्व हे भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव करत असून त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये ६ पैकी ५ लढती जिंकल्या आहेत. उत्तर प्रदेश संघाविरुद्ध एक पराभव सोडता महाराष्ट्राने सर्व संघावर ब गटात विजय मिळविला आहे. अन्य लढतींमध्ये कर्नाटक विरुद्ध बडोदा आणि तामिळनाडू विरुद्ध गुजरात हे सामने १२ मार्च रोजी अनुक्रमे सकाळी ९ वाजता दिल्ली येथे सुरु होतील तर विदर्भ विरुद्ध झारखंड हा सामना दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता दिल्ली येथे होणार आहे. गुजरात हा गतवेळचा विजेता संघ आहे तर भारताचा माजी कर्णधार धोनी हा झारखंडच नेतृत्व करत असून त्यांची लढत विदर्भ संघाशी होत आहे.
विजय हजारे ट्रॉफी ही भारतीय क्रिकेट बोर्डाची अधिकृत एकदिवसीय मालिका आहे. त्यात सर्व रणजी खेळणारे संघ सहभागी होतात. विजय हजारे ट्रॉफीला रणजी वनडे असेही संबोधले जाते. हा विजय हजारे ट्रॉफीचा १५ वा सिझन असून २८ संघ सहभागी झाले आहेत.
विजय हजारे ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढती
१२ मार्च २०१७
तामिळनाडू विरुद्ध गुजरात, पालम ग्राउंड, दिल्ली, सकाळी ९ वाजता
कर्नाटक विरुद्ध बडोदा, फिरोजशाह कोटला, दिल्ली, सकाळी ९ वाजता
१५ मार्च २०१७
विदर्भ विरुद्ध झारखंड, पालम ग्राउंड, दिल्ली, सकाळी ९ वाजता
बंगाल विरुद्ध महाराष्ट्र, फिरोजशाह कोटला, दिल्ली, सकाळी ९ वाजता