भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बुधवारी(२३ डिसेंबर) १६ वर्षे पूर्ण झाली. धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने जगभरातील धोनीच्या चाहत्यांनी विविध पद्धतीने हा दिवस साजरा केला.
मात्र महाराष्ट्रातील ‘महाराष्ट्रीयन एमएसडियन क्लब’ने सामाजिक भान जपत केलेल्या सेलिब्रेशनने सगळ्यांचीच मने जिंकली. धोनीच्या कारकिर्दीला सोळा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या क्लबने कोल्हापुरातील अनाथ मुलांना जेवण, मास्क, सॅनिटायझर आणि जर्सीचे वाटप केले. कोरोना महामारीच्या या कठीण काळात एका फॅन क्लबने दाखवलेल्या या सामाजिक भानाचे कौतुक होत आहे.
#16YearsOfDHONIsm celebration by @MHMsdianClub with Providing Lunch, Mask, Sanitizer & Jersey to orphan children in Kolhapur, Maharashtra
❤️#16YearsOfIconicDhoni DHONIsm Forever@msdhoni #MSDhoni #Dhoni @DHONIism @TrendsDhoni @TheDhoniEra pic.twitter.com/sFFPriP3ip— MAHARASHTRA MSDIAN CLUB™ (@MHMsdianClub) December 23, 2020
एमएस धोनी भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ चा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक, २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच २००९ ला भारतीय संघ धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला होता
धोनीने याचवर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३५० वनडे, ९० कसोटी आणि ९८ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने १७ हजारांहून अधिक धावा केल्या असून यात त्याच्या १६ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने यष्टीरक्षण करताना ८२९ विकेट्स यष्टीमागे घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी सचिनचा भारतीय फलंदाजांना कानमंत्र, म्हणाला
– सौरव गांगुलीने प्रतिस्पर्धी कंपनीची जाहिरात करण्याबाबत आम्हाला आक्षेप नाही, भारतीय संघाच्या प्रायोजकांची प्रतिक्रिया
– अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार, संघ सहकाऱ्याने उधळली स्तुतिसुमने