---Advertisement---

‘तू काय उखडलंस…’, नवीन उल हकला ट्रोल करणे मुंबईच्या ‘या’ फलंदाजाच्या अंगलट; युजर्सनी साधला निशाणा

Naveen-ul-Haq-And-Vishnu-Vinod
---Advertisement---

बुधवारी (दि. 24 मे) आयपीएल 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात मुंबईने लखनऊला 81 धावांनी पराभूत करत स्पर्धेबाहेर काढले. मात्र, 26 मे रोजी झालेल्या क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईचा गुजरात टायटन्स संघाविरुद्ध दारुण पराभव झाला. मुंबईविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा खेळाडू नवीन उल हक याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. तरीही त्याचा संघ पराभूत झाला. या पराभवानंतर मुंबईचा खेळाडू विष्णू विनोद याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला ट्रोल केले होते. आता क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईच्या पराभवानंतर चाहत्यांनीही विनोदला ट्रोल केले.

झाले असे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) याला बाद केल्यानंतर नवीन उल हक (Naveen ul Haq) याने त्याच्या कानावर हात ठेवत जल्लोष केला होता. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ जिंकल्यानंतर नवीनला ट्रोल केले गेले. विष्णू विनोद (Vishnu Vinod) याने टेबलवर 3 आंबे ठेवत विचित्र पोस्ट शेअर केली होती. क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामन्यात मुंबईच्या पराभवानंतर चाहते विनोदलाच ट्रोल करू लागले आणि त्यांनी त्याला त्याच्या कर्माचा धडाही शिकवला.

एका युजरने लिहिले की, “नवीनने 4 विकेट्स घेतल्या होत्या, तू काय उघडलंस? उलट तू स्कायवर दबाव टाकून त्याला बाद केले.”

दुसऱ्या एकाने लिहिले की, “आजूबाजूला जे घडते ते आपल्याकडे परत येते.”

विनोद का झाला ट्रोल?
खरं तर, क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्स संघ खूपच खराब स्तिथीत होता. रोहित शर्मा, नेहाल वढेरा आणि कॅमरून ग्रीन हे विस्फोटक खेळाडू लवकर बाद झाले होते. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा चांगली फलंदाजी करत होते. मात्र, नंतर तिलकही बाद झाला. त्यानंतर सूर्याची साथ देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने विष्णू विनोद याला पाठवले. मात्र, तो पूर्णत: फ्लॉप झाला. तो फक्त 7 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या खराब कामगिरीनंतर चाहते भडकले आणि त्याला जोरदार ट्रोल केले. (mi cricketer vishnu vinod heavily trolled after mumbai indians loss troll naveen ul haq post sweet mango)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ये ब्रोमान्स है! फायनलमध्ये पोहोचताच गिलला किस करण्यासाठी धावला मिलर, पंड्यानेही लावला नंबर; Photo
शतक ठोकल्यानंतर सचिनला भेटला शुबमन, मास्टर ब्लास्टरने हळूच कानात काय सांगितलं? पाहा फोटो

Ahmedabad Gujarat Titans Gujarat Titans vs Mumbai Indians Gujarat vs Mumbai Hardik Pandya Indian Premier League 2023 IPL IPL 2023 Lucknow super giants Lucknow Super Giants vs Mumbai Indians MI vs GT Qualifier 2 Mohit Sharma Mumbai Indians Narendra Modi Stadium QUALIFIER 2 rohit sharma Second Qualifier Match Shubman Gill Suryakumar Yadav Vishnu Vinod Vishnu Vinod And Naveen ul Haq Vishnu Vinod News Vishnu Vinod Troll अहमदाबाद आयपीएल आयपीएल २०२३ इंडियन प्रीमिअर लीग 2023 क्वालिफायर 2 गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स गुजरात विरुद्ध मुंबई दुसरा क्वालिफायर सामना नरेंद्र मोदी स्टेडिअम नवीन उल हक नवीन उल हक आंबे नवीन उल हक बातम्या मुंबई इंडियन्स मोहित शर्मा रोहित शर्मा लखनऊ सुपर जायंट्स लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स विष्णू विनोद विष्णू विनोद आणि नवीन उल हक विष्णू विनोद ट्रोल विष्णू विनोद बातम्या शुबमन गिल सूर्यकुमार यादव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---