---Advertisement---

IPL 2026: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! कॅच घेताना दुखापत झाल्यामुळे दिग्गज अष्टपैलू महिनाभर क्रिकेटपासून दूर

On: शुक्रवार, मे 1, 2026 8:13 PM
---Advertisement---

न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell santner) आयपीएल 2026 दरम्यान खांद्याला लागलेल्या दुखापतीमुळे किमान एक महिना मैदानाबाहेर राहणार आहे. या 34 वर्षीय दिग्गज अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians & Chennai super kings) आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 23 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्या मानेला आणि डोक्यालाही जोराचा झटका बसला होता.

सँटनरने आयपीएल सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सच्या कार्तिक शर्माचा डाईव्ह मारून झेल घेतला, मात्र या दरम्यान त्याच्या खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाली. या कारणास्तव तो आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसेल. न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातील त्याच्या उपलब्धतेबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल.

न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चार दिवसीय कसोटी सामना 27 मे रोजी बेलफास्टमध्ये सुरू होईल. यानंतर न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स (4-8 जून), द ओव्हल (17-21 जून) आणि ट्रेंट ब्रिज (25-29 जून) येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---