---Advertisement---

‘हात सोडू नको, साथ सोडू नकोस,’ अक्षर पटेलची ललितला साद

Axar-Patel-And-Lalit-Yadav
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्धचा आपला पहिला सामना जिंकत आयपीएलची धमाकेदार सुरुवात केली आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वखाली दिल्ली संघाने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला ४ विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यात ललित यादव आणि अक्षेर पटेल यांची खेळी जोरदार होती. या दोघांनी ७२ धावांवर ५ विकेट्स गमावल्यानंतर देखील विजयाची आशा सोडली नाही. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अक्षर पटेल ललित यादवची मुलाखत घेताना दिसत आहे. 

अक्षर पटेल (Axar Patel) आणि ललित यांचा हा व्हिडिओ सोमवारी आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला. सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. मुलाखतीत अक्षर म्हणाला, “आज आम्ही ललित यादवसोबत आहोत. हात सोडू नको, साथ सोडू नकोस, तू मला माझी भूमिका सांगितलीस. आम्हाला सामना शेवटपर्यंत बरोबर न्यायचा होता. असा आमचा प्लॅन होता. आम्ही एकत्र खेळलो, तर जिंकू शकतो हे आम्हाला माहीत होतं.”

मुंबई संघ हा सामना जिंकेल असे वाटले होते. ५ विकेट्स गेल्यानंतर अक्षर पटेल आणि ललित यादवने ज्या प्रकारे नाबाद ७५ धावांची भागीदारी रचली, ती कौतुकास्पद होती. दिल्लीच्या विजयात या दोन खेळाडूंचा मोठा वाटा आहे. ललितने ३८ चेंडूच ४८ धावा केल्या. अक्षरने १७ चेंडूत ७५ धावा केल्या. ललितने आपल्या डावात ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. तसेच अक्षरने २ चौकार आणि ३ षटकार लगावले.

मुंबईने फलंदाजी करताना २० षटकांत ५ विकेट्स गमावत १७७ धावा केल्या. या सामन्यात इशान किशनने ४८ चेंडूत ८१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या. खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या. मुंबईकडून बेसिल थंपीने ३ विकेट्स घेतल्या आणि अश्विनने २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलला नावं ठेवणाऱ्यांनो; IPLमधून देशाला काय मिळतं? बातमी वाचा समजेल

कृणालने बाद केल्यानंतर काय वाटले? हार्दिक म्हणतो, ‘जर आम्ही पराभूत झालो असतो तर…’

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल हैदराबाद वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---