इंडियन प्रीमियर लीग 2020 चा अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या लेखात आपण या सामन्यादरम्यान घडणाऱ्या खास आकडेवारीवर नजर टाकू.
• दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 15 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघाने 12 सामने जिंकले आहेत. या सामन्यात दिल्लीला मुंबईविरुद्ध 13 वा विजय मिळविण्याची संधी असेल. त्याचबरोबर मुंबईला दिल्लीविरुद्ध 16 वा सामना जिंकण्याची संधी असेल.
• या सामन्यात अर्धशतक झळकावून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला सुरेश रैना आणि विराट कोहलीच्या 38 अर्धशतकांच्या आकड्याला मागे टाकण्याची संधी असेल. जर रोहितने अर्धशतक ठोकले, तर आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत डेविड वॉर्नर, शिखर धवननंतर तो तिसऱ्या स्थानी येईल.
• जर मुंबई इंडियन्सने अंतिम सामना जिंकला, तर या संघाला 5 वेळा किताब पटकावण्याचा मान मिळेल.
• जर दिल्ली कॅपिटल्सने अंतिम सामना जिंकला, तर या संघाचा हा आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच किताब असेल.
• मुंबईचा अनुभवी अष्टपैलू कायरन पोलार्डने या सामन्यात दोन षटकार ठोकले, तर तो आयपीएलमध्ये आपले 200 षटकार पूर्ण करेल.
• जर कायरन पोलार्डने या सामन्यात 6 चौकार ठोकले, तर तो आयपीएलमध्ये आपले 200 चौकार पूर्ण करेल.
• जर या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने 12 चौकार ठोकले, तर तो आयपीएलच्या इतिहासात 600 चौकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरेल.
• जर दिल्लीचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने या सामन्यात 69 धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करेल. आयपीएलमध्ये 4000 धावा करणारा तो 11 वा फलंदाज ठरेल.
• जर या सामन्यात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक 61 धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण करेल. आयपीएलमध्ये 2000 धावा करणारा तो 39 वा फलंदाज ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय