---Advertisement---

Mi vs LSG: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का रोहित शर्मा संघाबाहेर, हार्दिक ने सांगितले कारण

Rohit Sharma
---Advertisement---

आयपीएल 2015 मधील मुंबई इंडियन्सचा चौथा सामना लखनऊ संघाविरूद्ध होत आहे. हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्लेईंग इलेव्हन सांगताच चाहत्यांना धक्का दिला. रोहित शर्मा लखनऊ विरुद्ध आजच्या सामन्यात खेळणार नाही. हार्दिकने नाणेफेकीनंंतर या मोठ्या निर्णयामागचं कारणही सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्मा संघाबाहेर झाला आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो आजचा सामना खेळू शकणार नाही. रोहित शर्मा अखेरचा सामन्यातील आयपीएल 2021 मध्ये संघाबाहेर झाला होता.

आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्माच्या खेळाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा मागच्या सलग तीन सामन्यांमध्ये अपयशी ठरला. चेन्नईविरुद्ध रोहितला खातेही उघडता आले नाही. गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात त्याने फक्त आठ धावा केल्या. तर केकेआर विरुद्ध त्याने 13 धावा केल्या. म्हणजे 3 सामन्यात रोहितने फक्त 21 धावा केल्या आहेत.

टॉसच्या वेळेस हार्दिकला प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारण्यात आले तेव्हा हार्दिक म्हणाला, रोहित शर्मा संघाबाहेर झाला आहे. त्याला काल नेट्समध्ये सराव करताना गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो खेळताना दिसणार नाही.

हार्दिक पांड्याने सांगितले की, रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. लखनऊ मधील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली. रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---