---Advertisement---

राहुलवर फक्त शॅम्पेन कॉर्क फेकले, माझ्यावर तर बाटल्या फेकल्या होत्या; दिग्गजाने ओढले ताशेरे

On: सोमवार, ऑगस्ट 16, 2021 1:24 PM
---Advertisement---

लॉर्ड्सवर इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान एक लज्जास्पद कृत्य समोर आले. जेव्हा भारताचा सलामीवीर केएल राहुल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही ब्रिटिश प्रेक्षकांनी त्याच्यावर शॅम्पेनच्या बॉटलची झाकणे फेकली गेली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल बेवन केएल राहुलला मिळालेल्या अशा वागणुकीमुळे खूप नाराज झाला आहे.

मायकेल बेवनने ब्रिटिश चाहत्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मायकेल बेवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचे छायाचित्र शेअर करत म्हटले आहे की, “प्रेक्षकांकडून अशा प्रकारची वागणूक अजिबात सहन केली जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे वारंवार घडते आहे. याआधी माझ्यावरही लॉर्ड्सवर खेळतांना बिअरच्या बाटल्या फेकल्या गेल्या होत्या.”

ही घटना पाहून समालोचकांनीही हे सर्व लज्जास्पद आहे असे म्हटले आहे. जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीला याबद्दल कळले तेव्हा तोही संतापला होता. विराटने लगेच राहुलकडे इशारा केला होता की, ती सर्व झाकणे परत त्याच चाहत्यांकडे भिरकावून दे.

दुसरीकडे, भारताच्या 364 धावांच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाचा पहिला डाव 391 धावांवर आटोपला. इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 27 धावांची आघाडी मिळाली होती. भारतीय संघासाठी मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. ईशांत शर्माने देखील खूप प्रभावी गोलंदाजी करत 3 बळी घेतले होते. त्यानंतर चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताने 6 गडी गमावून 181 धावा केल्या आहेत. भारताकडे आता 154 धावांची आघाडी आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी सामन्याचा काय निकाल लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कमी प्रकाशातही पंचांनी चालू ठेवला खेळ, विराट-रोहितचा चढला पारा; राग व्यक्त करताना व्हिडिओ व्हायरल

कर्णधार रूटच्या संयमाचा तुटला बांध, भर मैदानात पंतसोबत घातला वाद; फोटो व्हायरल

अन् दर्शक झाले अतिआनंदी, जणू पुजाराने शतक केल्यासारख्या वाजवल्या टाळ्या; पाहा नेमकं काय घडलं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---