---Advertisement---

भारत-पाक सामन्यावर मायकल क्लार्कचे मोठे विधान; फायनलसाठी निवडले ‘हे’ दोन संभाव्य संघ

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 7:24 PM
---Advertisement---

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सर्व क्रिकेट तज्ज्ञ आपापली भाकीते वर्तवत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने टी20 वर्ल्ड कप 2026 चे फायनलिस्ट आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठे विधान केले आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासूनच करणार आहे, तर पाकिस्तानविरुद्धचा महामुकाबला (15 फेब्रुवारी) रोजी खेळवला जाईल.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क म्हणाला की, टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये भारतासोबत ऑस्ट्रेलियाचा संघ असेल. यापूर्वी आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया 2023 च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने आले होते, जिथे ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवला होता.

ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह ‘ग्रुप-ए’ मध्ये आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमानसह ‘ग्रुप-बी’ मध्ये आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याबद्दल बोलताना मायकल क्लार्कने ‘बियॉन्ड 23 क्रिकेट पॉडकास्ट’वर म्हटले की, “प्रत्येकाला हा थरारक सामना पाहायचा असतो, परंतु भारताने गेल्या दीर्घकाळापासून पाकिस्तानला मात दिली आहे. पाकिस्तान कधीच भारताच्या जवळपासही फिरकू शकला नाही. पाकिस्तानला भारताविरुद्ध खेळताना येणारा दबाव आणि त्यातील चुरस हाताळायला शिकावे लागेल.”

भारताने आतापर्यंत दोनदा टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे. पहिल्यांदा 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्यांदा 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. यावेळी भारताकडे 3 ऐतिहासिक विक्रम करण्याची संधी आहे. पहिले म्हणजे- आतापर्यंत कोणताही यजमान देश टी20 वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही. दुसरे म्हणजे- कोणताही संघ आपल्या मायदेशात टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही आणि तिसरे म्हणजे- आतापर्यंत कोणताही संघ तीन वेळा टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवू शकलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---