ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात भारतीय संघात चार बदल करण्यात आले. त्यापैकी मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांनी कसोटीत पदार्पण केले. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात शुबमन गिलने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे त्याचे कौतुक झाले. आता माइकल हसीनेही त्याचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाचा ऍडलेडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभव झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशात परतला. त्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात नेतृत्वाची माळ अजिंक्य रहाणेच्या गळ्यात पडली. त्याने या सामन्यात उत्तम नेतृत्व करताना शतकीय खेळी केली. त्या जोरावर भारतीय संघाने विजय मिळवला.
या सामन्यात पदार्पण करणार्या शुभमन गिलने दोन्ही डावात 45 आणि नाबाद 35 धावांची खेळी करत विजयात योगदान दिले. त्यामुळे त्याचे सर्वांनी कौतुक केले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू माइकल हसी सुद्धा कौतुक करताना म्हणाला, “हा खेळाडू पुढील 10 वर्षे भारतीय संघासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे.”
माइकल हसी म्हणाला, “हे भारतीय संघाचे दमदार पुनरागमन होते. रहाणे म्हणाला होता की 90 मिनिटांच्या खराब कामगिरीमुळे आम्ही पहिला सामना गमावला होता.”
शुभमन गिल बद्दल बोलताना माइकल हसी म्हणाला,”तो एक महान खेळाडू आहे. तो पुढील 10 वर्षे भारतीय संघासाठी खेळेल.”
माइकल हसी भारतीय गोलंदाजीबद्दल बोलताना म्हणाला,” जेव्हा मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर पडला, तेव्हा मला वाटले भारतीय संघाची गोलंदाजी प्रभाव पाडू शकणार नाही. मात्र असे झाले नाही. शून्यातून येत सिराजने आपला सर्वश्रेष्ठ खेळ दाखवला.”
दुसर्या कसोटी सामन्यात पृथ्वी शाॅच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली होती. त्याने संधीचे सोने करताना शानदार फलंदाजी केली. आता दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
त्यावेळी सिडनी कसोटीतील द्विशतकी खेळीदरम्यान सचिन तेंडुलकरने ऐकले होते ‘हे’ गाणे
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने निवडला दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ, केवळ ‘या’ एका भारतीयाला दिले स्थान
‘डेल स्टेन’ने आयपीएलबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय! नववर्षाच्या सुरुवातीलाच आरसीबीच्या चाहत्यांना धक्का