---Advertisement---

‘या’ कारणामुळे चालत नाहीये स्टीव्ह स्मिथची बॅट, लॅब्यूशानेने केला खुलासा

On: शनिवार, जानेवारी 2, 2021 10:30 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या मालिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर दुसरा सामना संघाने अशाप्रकारे गमावणे हे अनेक ऑस्ट्रेलियन दिग्गजांना रुचले नाही. त्यातच दोन्ही सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅट चाललेली नाही. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात स्मिथच्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव होत असल्याची चर्चा सुरू आहे. मालिकेत आत्तापर्यंत खेळलेल्या 4 डावात स्मिथने केवळ 10 धावा केलेल्या आहेत. अशातच स्मिथचा सहकारी मार्नस लॅब्यूशानेने स्मिथची पाठराखण केली आहे.

लॅब्यूशाने पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला, ” स्मिथने जास्त धावा केलेल्या नाहीत. त्याने कोरानाच्या काळात मर्यादीत षटकांचे जास्त सामने खेळलेले आहेत व त्यामुळे त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा जास्त सराव नाही.”

स्मिथची स्तुती करताना लब्यूशाने म्हणाला, “स्मिथ जवळ जवळ 80 सामने खेळून 60 च्या सरासरीने धावा बनवत आहे. त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच आपल्याला दाखवून दिले आहे की तो किती निरंतरपणे धावा बनवतो आहे. हे विसरून चालणार नाही की त्याने काही दिवसांपूर्वीच 60 चेंडूत दोनदा शतक केले आहे.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की स्मिथ आपला गेलेला फॉर्म पुन्हा मिळवतो अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

…अन् २८ वर्षांपूर्वी ‘या’ भारतीयाच्या विकेटने शेन वॉर्न पर्वाची सुरुवात झाली

‘तो’ क्रिकेटपटू भारतीय गोलंदाजांचा कर्णधार, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा

तिसर्‍या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाची लागली आस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---