इंदोर येथे 1 मार्चपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये पाहुण्या संघाला नमवत भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील या उर्वरित दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करेल. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल कॅस्प्रोविचने ऑस्ट्रेलियन संघाला आपल्या ताकदीवर खेळण्याचा सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या दोन कसोटीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत दोन तर दुसऱ्या कसोटीत तीन पूर्णवेळ फिरकी गोलंदाजांना खेळवले. या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना काही प्रमाणात कोंडीत पकडले. मात्र, ते भारतीय फिरकी गोलंदाजां इतके यशस्वी होऊ शकले नाहीत. याच मुद्द्यावर बोलताना कॅस्प्रोविच म्हणाला,
“इंदोर कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलंड व कॅमेरून ग्रीन हे तीन वेगवान गोलंदाज खेळवावेत. आपल्याकडे चांगले फिरकी गोलंदाज असले तरी ते भारतीय गोलंदाजांची बरोबरी करू शकत नाहीत. आपण आपल्याच ताकदीवर खेळायला हवे. पहिल्या कसोटीत मर्फी बळी मिळवण्यात यशस्वी ठरला कारण बॉलंड एका बाजूने सातत्याने तिखट मारा करत होता.”
ऑस्ट्रेलियन संघ 17 वर्षांच्या कालावधीनंतर भारतात मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने या मालिकेत सहभागी झाला होता. ऑस्ट्रेलिया तसेच इतर देशांच्या माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियालाच या मालिकेत विजयाची संधी असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्ष मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा दुबळा दिसला. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या सर्वच फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी भारतीय संघाने तीन दिवसात जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सलग चौथ्यांदा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
(Michael Kasprowicz Said Australia Spin Attack Not Good As India )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पैसा वसूल सामना, पण आम्ही निराश…’, न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत होताच कर्णधार स्टोक्सलाही झालं दु:ख
राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्याचा अर्थ काय? मौन सोडत रोहित स्पष्टच बोलला, ‘त्याला महत्त्वच देऊ नका’