भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला यजमान ऑस्ट्रेलिया संघासोबत १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावसकर’ कसोटी मालिका खेळायची आहे. परंतु या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात ३ दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान भारताचा भक्कम बचाव असलेला फलंदाज चेतेश्वर पुजारा अफलातून चेंडूवर त्रिफळाचीत झाला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भारताचा अभेद्य फलंदाज म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात संघर्ष करताना दिसला. दुसऱ्या डावातील दहावे षटक टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मायकल नासेर आला होता. त्याच्या या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर पुजाराने बचावात्मक खेळ केला. परंतु तिसऱ्याच चेंडूवर नासेरच्या जबरदस्त गोलंदाजीने पुजाराचा त्रिफळा उडवला.
त्यामुळे विरोधी संघाला घाम फोडत फलंदाजी करणारा पुजारा या डावात शून्यावरच तंबूत परतला.
Michael Neser with an absolute seed to get rid of Cheteshwar Pujara for a duck.
India A are 2/46, trailing by 13 runs.#AUSAvINDA pic.twitter.com/VeNSLRLpnX
— Nic Savage (@nic_savage1) December 8, 2020
No better sight for a fast bowler than this! An absolute beauty from Michael Neser to get Cheteshwar Pujara https://t.co/5SuLHlTFQZ #AUSAvIND pic.twitter.com/h8VJOKp4Gn
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2020
पुजाराने पहिल्या डावात १४० चेंडूंचा सामना करताना ५४ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने ५ चौकारही ठोकले होते.
पुजाराने भारतीय संघाकडून आतापर्यंत ७७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४८.६६ च्या सरासरीने ५८४० धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १८ शतके आणि २५ अर्धशतकेही ठोकली आहेत. सोबतच त्याची कसोटीतील सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद २०६ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल
लईच भारी! पृथ्वी शॉने घेतला भन्नाट झेल; ऑस्ट्रेलियन कर्णधाराला धाडलं तंबूत, पाहा Video