क्रिकेट इतिहासातील यशस्वी कर्णधारांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे निश्चितच येईल. जेव्हा कधी सर्वोत्कृष्ठ कर्णधारांविषयी बोलले जाते तेव्हा धोनीचे उदाहरण दिले जाते. बरेच माजी क्रिकेटपटू आपल्या देशातील खेळाडूंना आणि कर्णधारांना धोनीकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला देतात. धोनी बराच काळ भारताचा कर्णधार राहिला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याला वाटते की त्यांच्या देशाला दुसरा टी20 विश्वचषक जिंकूण देणारा जोस बटलर हा धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.
जोस बटलर (Jos Buttler) याने पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. इयाॅन मॉर्गन (Eoin Morgan) याने कर्णधारपद सोडल्यानंतर बटलरवर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. बटलरने ही जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली. सुपर-12 फेरीत आयर्लंड संघाकडून मिळालेल्या पराभवानंतर संघाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध धमाकेदार खेळी करत संघाला अंतिम फेरीत पोहचवले. अंतिम सामन्यात देखील इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत विश्वचषक जिंकला.
धोनीच्या मार्गावर बटलर
मायकल वॉन (Michael Vaughan) याच्या मते बटलर बराच काळ इंग्लंडचा कर्णधार राहू शकतो, ज्या पद्धतीने धोनीने भारताचे नेतृत्व केलेले. वॉनने एका वृत्तपत्रात लिहिले की, “बटलरने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आहे. वयाच्या 32व्या वर्षी त्याला त्याचा वारसा निर्माण करण्याची संधी आहे. धोनी बरेच वर्ष भारताचा कर्णधार होता. बटलर देखील हे काम करू शकतो. खासकरून, आता तो एका विशिष्ट फॉर्मॅटवर लक्ष केद्रिंत करू शकतो.त्याच्यात क्षमता आहे.हे तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहू शकता. जेव्हा तुमच्या जवळ डावखुरे वेगवान गोलंदाज, तीन फिरकीपटू, स्विंग करणारे गोलंदाज असतात, म्हणजेच एक कर्णधार म्हणून तुम्ही सर्व बाजू परिपूर्ण केल्या असतील तर मर्यादित षटकांच्या सामन्यात हा तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो. तुमच्याकडे पर्याय असले पाहिजे. बटलरकडे 1 पासून 11व्या क्रमांकापर्यंत सर्व सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. ”
या टी20 विश्वचषकात इंग्लंड संघाला आयर्लंड संघाकडून पराभव स्वीकारावा लागलेला. त्यानंतर इंग्लंडने धमाकेदारपणे पुनरागमन करत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताला एकतर्फी सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या अंतिम सामन्यात पाकिस्ताानचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.(Michael Vaughan has told that Jos Buttler is following steps of M.S. Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! क्रिकेटचा ‘हिटमॅन’ घडवणाऱ्या दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार
‘रोहित निर्णय घेत नाही, मैदानावर तोंड लपवण्यासाठी जागा शोधतो’, माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया