इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. यात पहिल्या डावात भारतीय संघाची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली. ज्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात केवळ ७८ धावाच बनवू शकला. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथमच इंग्लंड दौऱ्यात नाणेफेक जिंकली होती, ज्यानंतर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ज्यावेळी कोहलीचा हा निर्णय चुकल्याचे समजले. त्यावेळी अनेक क्रिकेटपटूंनी कोहलीच्या या निर्णयावर आणि रणनीतीवर प्रश्न केले होते.
यातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील आता टीका केली आहे. वॉनच्या मते ईशांत शर्माने भारताकडून गोलंदाजी करताना अत्यंत खराब प्रदर्शन केले. तरीही दोन्ही दिवसाची सुरुवात ईशांत शर्माने केली यावर मायकल वॉनने आश्चर्य व्यक्त केले.
कसोटी क्रिकेटसाठी समर्पित असलेल्या बीबीसीच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना वॉन म्हणाला, “आपण सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ईशांत शर्माने भारताकडून अत्यंत खराब गोलंदाजी केली. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील ईशांत शर्मानेच गोलंदाजीची सुरुवात केली.”
“अशावेळी तुम्ही दिवसाच्या सुरूवातीच्या काही तासात आपल्या उत्कृष्ट गोलंदाजाकडून गोलंदाजी करून घेऊ इच्छिता. जो की, जसप्रीत बुमराह आहे. तसेच मोहम्मद शमीला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्यासाठी का दिले जात नाही? हे मला माहित नाही मात्र, विराट कोहलीला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील,” असेही वॉन म्हणाला.
ईशांत शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपली कमाल दाखवू शकला नाही. त्याने एकूण २२ षटके टाकली, ज्यामध्ये त्याने ४.२० च्या इकोनॉमी रेटने ९२ धावा दिल्या. त्याची ही इकोनॉमी कसोटी सामन्याच्या दृष्टीने खूप जास्त आहे. ईशांत शर्माची पहिल्या दिवसापासून खराब गोलंदाजी राहिली. पहिल्या डावात त्यावा बिना विकेट्सचेच समाधान मानावे लागले.
यादरम्यान, भारतीय संघाच्या ७८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंड संघाने जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर ४३२ ची मोठी धावसंख्या उभी केली. ज्यामुळे इंग्लंडचा संघ ३५४ धावांनी आघाडीवर आहे. इंग्लंडची ही भारताविरुद्धची ५ वी सगळ्यात मोठी आघाडी होती. याआधी २०११ साली इंग्लंडने एजबेस्टन कसोटीमध्ये भारतावर तब्बल ४८६ धावांची आघाडी मिळवली होती आणि तो सामना इंग्लंड संघाने आपल्या खिशात टाकला होता.
महत्वाच्या बातम्या –
–‘भारतीय संघ लढवय्या, पण हे लीड्स आहे कोलकाता नाही,’ इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची चेतावणी
–खराब फॉर्मात असताना पुजारावर टीका करणाऱ्यांना रोहितचे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘त्यांची स्मरणशक्ती कमकुवत’
–जड्डूचा मोठा विक्रम, कपिल देवनंतर ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा बनला फक्त दुसरा अष्टपैलू