गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडिअम सज्ज आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सलग दुसऱ्या वर्षी आपल्या संघाचे अंतिम सामन्यात नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाचे अनेक समीक्षक कौतुक करत आहेत. त्याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने त्याच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
हार्दिक याला मागील वर्षी प्रथमच कोणत्याही स्पर्धेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करत आपल्या संघाला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्याने थेट संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचे देखील संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने चार द्विपक्षीय मालिका आपल्या नावे केल्या.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने एका मुलाखतीत बोलताना म्हटले,
“हार्दिक पंड्या भारताचा पुढील कर्णधार असेल. तो भारताचा कर्णधार होईल हे मी सर्वांना पटवून देईल. हे कधी होईल हे मात्र माहीत नाही. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो भारताचे नेतृत्व करेल. हार्दिक अतिशय शांत असतो. त्याच्याकडे खेळाची उत्तम जाण आहे आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे मी चिंतेत होतो. मात्र, आता त्याची देहबोली पाहून वाटते की तो एकदम तंदुरुस्त आहे. मैदानावर तो नेहमीच कल्पकतेने वावरताना दिसतो.”
हार्दिक याच्याकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून अनेक जण पाहतात. या अंतिम सामन्यात त्याच्याकडे सलग दोन वेळा आयपीएल जिंकणारा कर्णधार होण्याची संधी असेल. यापूर्वी धोनी व रोहित शर्मा यांनी चेन्नई व मुंबईसाठी ही कामगिरी करून दाखवली आहे.
(Michael Vaughan Said Hardik Pandya Is Indias Next White Ball Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’
आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल