इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत केले. यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील इंग्लंडला चांगलेच फटकारले. तसेच इंग्लंडमध्ये असलेल्या कमतरतेचे देखील उघडपणे आलोचना केली.
वॉन म्हणाला की वर्षानुवर्षे आपण ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना हरवत आलो आहे. मात्र आता आपल्याला इथे संघर्ष करावा लागत आहे. तसेच इंग्लंडला आणखी प्रभावी खेळ दाखवण्याची गरज आहे, त्यांना दबाव झेलता आला पाहिजे.
याबाबत डेली टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या एका स्तंभात मायकल वॉन म्हणाला, “वर्षानुवर्षे आपण ऑस्ट्रेलिया आणि भारत यांना आपल्या मायदेशात पराभूत करत आलो आहोत. मात्र आता आपणच इथे संघर्ष करत आहोत. इंग्लंडने दबावात देखील कसे चांगली कामगिरी करता येईल, यावर विचार केला पाहिजे. याबाबत त्यांनी आणखी कठोर व्हायला हवे.”
लीड्सवरील विजयानंतर पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली होती. तसेच चौथ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळला होता. मात्र, दुसर्या डावात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत ४६६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ २१० धावतच गारद झाला. यावर देखील मायकल वॉनने इंग्लिश फलंदाजांना खरीखोटी सुनावली.
यावर वॉन म्हणाला, “सपाट खेळपट्टीवरही खेळी करण्यासाठी त्यांच्यात(इंग्लंड) गती आणि वेगळेपणाची कमतरता भासली. इंग्लिश फलंदाजांना पूरक अशी ही खेळपट्टी होती. परंतु, तरीही इंग्लंडचे फलंदाज आवश्यक धावा बनवू शकले नाही. यामध्ये एकाग्रतेची देखील कमतरता जाणवली, ज्यामुळे फलंदाज चुकीचे शॉट मारत होता.”
तसेच वॉनने भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले. खास करून जसप्रीत बुमराहचे यावर बोलताना तो म्हणाला, “भारतीय संघाला श्रेय मिळाले पाहिजे. त्यांनी रिव्हर्स स्विंग प्राप्त केला. माझ्या मते बुमराहने केलेली ती गोलंदाजी या सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. जिथे आम्ही संधी गमावली. तिथे तसेच आम्हाला इतर क्षेत्रांवर देखील काम करणे गरजेचे आहे . कदाचित आम्ही पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीचा जास्त फायदा घेऊ शकलो नाही. मिळालेल्या संधींचा आम्ही फायदा घ्यायला हवा होता.”
दरम्यान, ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या ४ कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाने २-१ ने आघाडी मिळवली आहे. यानंतर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ वा आणि अंतिम कसोटी सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–“तर शार्दुल कपिल देव नंतर भारतीय संघात असलेली अष्टपैलू खेळाडूची समस्या सोडवू शकतो”
–भारत-इंग्लंड संघात पुढीलवर्षी खेळवली जाणार एकदिवसीय आणि टी-२० मालिका; असे आहे वेळापत्रक
–शिखर धवन पूर्वी ‘या’ ४ भारतीय क्रिकेटपटूंचाही झाला होता घटस्फोट; एक आहे भारताचा माजी कर्णधार