इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मुंबईने या हंगामात ७ सामने खेळले आहेत. यात त्यांना ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. परंतु संघातील फलंदाज १५० धावा उभारण्यासाठीही संघर्ष करताना दिसत होते. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा धुव्वा उडवला होता.
आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित असली तरी देखील बीसीसीआय येत्या काही महिन्यात भारताबाहेर आयपीएल स्पर्धा खेळवण्याच्या विचारात आहे. त्यामुळे असे काही प्रतिभाशाली खेळाडू आहेत, ज्यांना आपल्या संघाकडून अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाहीये. त्यांना मुंबई इंडियन्स संघ आपल्या संघात स्थान देऊ शकतो.
१) करुण नायर : कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा फलंदाज करुण नायर या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु त्याला या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन देखील या आयपीएल हंगामात फॉर्ममध्ये नसल्याचे दिसून आले आहे. त्याच्या ऐवजी कृणाल पंड्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला करुण नायरसारख्या फलंदाजाची आवश्यकता आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर येऊन ताबडतोड फलंदाजी करू शकतो. यामुळे इतर फलंदाजांना धावा करणे सोपे जाऊ शकते.
२) जलज सक्सेना : आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जलजला पंजाब संघाने एकच सामना खेळण्याची संधी दिली. या प्रतिभावान खेळाडूला मुंबई इंडियन्स संघ मिड सिजन ट्रान्सफरद्वारे विकत घेऊ शकतात. मुंबई इंडियन्स संघाचा फिरकी गोलंदाज जयंत यादव हा साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे जलजला संधी मिळाली तर तो ऑफ स्पिन गोलंदाजीसह ७ व्या क्रमांकांवर येऊन फलंदाजीमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावू शकतो.
३) उमेश यादव : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. या ८ सामन्यांमधून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराह आणि धवल कुलकर्णी यांच्याशिवाय दुसरा कोणी अनुभवी भारतीय गोलंदाज नाहीये. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघात जर उमेश यादवला संधी मिळाली तर तो संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘असे केले नसते तर आज बाबा आमच्यासोबत नसते,’ अश्विनने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग
बीसीसीआयची मोठी योजना, श्रीलंका दौऱ्यावर विराट आणि रोहितला ‘नो एंट्री’; जाणून घ्या कारण